Hasbulla Magomedov vs Abduroziq Fight: कोण आहे अब्दुरोजिक, 'मिनी खबीब' विरोधात फाईट करणाऱ्या या ताजिक सिंगरबाबत जाणून घ्या खास गोष्टी
ताजिकिस्तानचा 17 वर्षीय गायक अब्दुरोजिक याने अलीकडच्या काळात 18 वर्षीय ब्लॉगर हस्बुल्ला मागोमेडोव्ह यांच्याशी ‘मंजूर’ फाईटची बातमी व्हायरल झाल्यानंतर अलीकडच्या काळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फाईटचे आयोजन चेचनच्या 19 वर्षीय ब्लॉगर आशाब तमाएवने केले होते. दोन्ही स्पर्धकांमधील ही फाईट आधीच झाली आहे परंतु ते ‘अनैतिक’ असल्याने फाईटचा व्हिडिओ अद्याप प्रसिद्ध झाला नाही आहे.
Hasbulla Magomedov vs Abduroziq Fight: ताजिकिस्तानचा (Tajakistan) 17 वर्षीय गायक अब्दुरोजिक (Abduroziq) याने अलीकडच्या काळात 18 वर्षीय ब्लॉगर हस्बुल्ला मागोमेडोव्ह (Hasbulla Magomedov) यांच्याशी ‘मंजूर’ फाईटची बातमी व्हायरल झाल्यानंतर अलीकडच्या काळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फाईट विरोधात नुकताच वाद निर्माण झाला कारण ती ड्वार्फिझमच्या (Darfism) दोन किशोरवयीन मुलांमधील स्पर्धा होती आणि रशियाच्या बौने अॅथलेटिक असोसिएशनने (Russia’s Dwarf Athletic Association) ही ‘अनैतिक’ असल्याबद्दल त्याचा निषेध केला होता. या फाईटचे आयोजन चेचनच्या 19 वर्षीय ब्लॉगर आशाब तमाएवने केले होते. दोन्ही स्पर्धकांमधील ही फाईट आधीच झाली आहे परंतु दोन स्पर्धकांचे एकत्रित वजन तब्बल 35 किलोग्रॅम इतके असल्यामुळे ते ‘अनैतिक’ समजले जात असल्याबद्दल संतप्ततेने फाईटचा व्हिडिओ अद्याप प्रसिद्ध झाला नाही आहे.
प्री-फाइट क्लिपमध्ये आशब तमायेव दिसला आहे, ज्यात अब्दुरोजिकने हसबुल्लाला धमकी दिली आहे अशा व्हिडिओला नऊ लाख लोकांनी पहिले आहेत: ‘जर तुम्ही आता माझ्यावर बोट जरी उचलले तर ते तुझा मृतदेह घेऊन जातील.’ यादरम्यान आज आपण अब्दुरोजिक याच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. अब्दुरोजिक ताजिकिस्तानमधील एक गायक आहे आणि जगातील सर्वात लहान गायक म्हणून ओळखला जातो. ताजिक रॅप गाणी गाण्याच्या आपल्या कौशल्यामुळे त्याने सोशल मीडियावर त्याला लोकप्रियता मिळवली. त्याचे अवलोड मीडिया नावाचे एक यूट्यूब चॅनेल आहे ज्याचे 35 हजार सदस्य आहेत.
अब्दुरोजिक 17 वर्षाचा असून 2003 मध्ये ताजिकिस्तानच्या पांजाकांत जिल्ह्यातील गश्दरवा गावात एका माळीच्या कुटुंबात त्याचा जन्मला होता. लहानपणी अब्दुरोजिक रिकेट्सच्या गंभीर आजाराने ट्रस्ट होता आणि अपुऱ्या आर्थिक संसाधनामुळे त्यांचे कुटुंब त्याचा उपचार करू शकले नाही ज्यामुळे त्याची वाढ थांबली. वयाच्या 16 व्या वर्षी त्याचे वजन सुमारे 12 किलो होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)