Neymar Jr Breaks Coronavirus protocol: नेमारने तोडला UEFAचा COVID-19 प्रोटोकॉल, चॅम्पियन्स लीग फायनल मॅचसाठी बंदीची शक्यता

मंगळवारी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य सामन्यात लीपझिगविरुद्ध पीएसजीच्या ऐतिहासिक विजयानंतर नेमार कॅमेऱ्यावर शर्टची अदलाबदल करताना पकडला गेला. 'द सन'मध्ये नमूद केल्यानुसार कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यूईएफएच्या नवीन वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, नेमारवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.

फुटबॉलर नेमार (Photo Credit: Getty)

ब्राझीलचा स्टार फुटबॉल नेमार (Neymar) याच्यावर चॅम्पियन्स लीगच्या अंतिम (Champions League final) सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. मंगळवारी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य सामन्यात लाइपत्सिगविरुद्ध (Leipzig) पीएसजीच्या (PSG) ऐतिहासिक विजयानंतर नेमार कॅमेऱ्यावर शर्टची अदलाबदल करताना पकडला गेला. फ्रेंच दिग्गजांच्या 'लाइपत्सिगविरुद्ध 3-0 ने जिंकल्यानंतर नेमारने मार्सेल हॅल्स्टनबर्गबरोबर (Marcel Halstenberg) आपला शर्ट बदलला. पीएसजीने प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 'द सन'मध्ये नमूद केल्यानुसार कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यूईएफएच्या नवीन वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, नेमारवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते आणि दुसर्‍या खेळाडूबरोबर शर्ट बदलल्यामुळे स्वत:ला 12 दिवस क्वारंटाइन करावे लागू शकते. नियमात म्हटले आहे, “खेळाडूंनी त्यांचा शर्ट अदलाबदल करण्यापासून परावृत्त करण्याची शिफारस केली जाते.” (कोविड-19 दूर ठेवण्यासाठी बार्सिलोनाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलर लिओनेल मेस्सी 88,000 रुपयाच्या 'अँटी-कोरोना' मॅट्रेसवर झोपतो?)

नियमांनुसार शर्ट अदलाबदल केल्याने नियमात स्पष्टपणे 'बंदी' नसल्यामुळे 'शिफारस केलेले' या शब्दाचा उल्लेख नेयमारला मदत करू शकेल असे तज्ञांचे मत आहे. नेयमारने प्रोटोकॉलचे अनुसरण न करण्याचा स्पष्ट निर्णय घेतला असला तरी त्याचे पालन न केल्यास यूईएफए समिती ब्राझीलच्या या स्टार फुटबॉलरवर शिस्तभंगाची कारवाई करू शकते. जर तसे झाले तर नेमारला रविवारी अंतिम सामन्यात बेयर्न म्यूनिख व लिओन शोडाउनमधील विजेत्याविरुद्ध फायनल सामना खेळता येणार नाही.

पीएसजीने गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे परंतु इतिहासात पहिल्यांदा त्यांनी यूईएफए चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरी गाठली आहे. याचे एक मोठे श्रेय नेमारकला जाते ज्याने लाइपत्सिगविरुद्ध संपूर्ण सर्वोत्तम कामगिरी केली. ब्राझिलियन आता 59 चॅम्पियन्स लीगमध्ये 59 गोलमध्ये- 35 गोल आणि 24 असिस्टमध्ये असे मिळून 59 गोलांमध्ये सामील झाला आहे. 2013/14च्या मोसमात पदार्पण केल्यापासून, नेयमारने उच्चपदस्थ युरोपियन क्लब स्पर्धेत जगातील कोणत्याही खेळाडूंपेक्षा जास्त सहाय्य केले आहेत. आणि जर शर्ट-अदलाबदलीच्या घटनेनंतर 28 वर्षीय फुटबॉलरला क्वारंटाईन केले तर पीएसजीच्या पहिल्या चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदाच्या अपेक्षेने त्यांना मोठा धक्का बसणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif