30-Year Ban For French Footballer: फुटबॉल खेळताना पंचास मारला Punch; फ्रेंच फुटबॉलपटूवर 30 वर्षांची बंदी

तसेच, या फुटबॉलपटूला 'धर्मांध' म्हणूनही संबोधण्यात आले आहे. फुटबॉल (France footballers ) खेळताना पंचांना केलेल्या मारहाणी प्रकरणी त्याच्यावर इतके कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

Football | Representational Image (Photo Credits: Pixabay)

फ्रान्समधील (France) एका हौशी फुटबॉलपटूच्या (Amateur Footballer) फुटबॉल (Football) खेळण्यावर तब्बल 30 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच, या फुटबॉलपटूला 'धर्मांध' म्हणूनही संबोधण्यात आले आहे. फुटबॉल (France footballers ) खेळताना पंचांना केलेल्या मारहाणी प्रकरणी त्याच्यावर इतके कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. एका सामन्यादरम्यान त्याने रागातून चक्क पंचांनाच ठोसे लगावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. फुटबॉलपटूवर लावण्यात आलेल्या दीर्घकालीन बंदीबद्दल बलताना मध्य फ्रान्समधील लॉइरेट फुटबॉल जिल्ह्याचे अध्यक्ष बेनोइट लेन यांनी म्हटले आहे की, त्याला देण्यात आलेली शिक्षा आणि ठोठावलेला दंड योग्य आहे. या धर्मांधांना पुन्हा फुटबॉल खेळपट्टीवर पाय ठेवता येणार नाही. त्यांना तेथे मुळीच जागा नाही.

दरम्यान, बंदी घालण्यात आलेल्या फुटबॉलपटूचे नाव जाहीर करण्यात आले नाही. मात्र, तो 25 वर्षांचा असल्याचे समजते. फ्रान्समधील (France) एका मौदानावर 8 जानेवारी रोजी स्थानिक चषक सामना सुरु होता. सामन्यादरम्यान एंटेंट स्पोर्टिव्ह गॅटिनाईससाठी(Entente Sportive Gatinaise) एक विशिष्ट कृती केल्याने त्याला बाहेर पाठविण्यात आले. यावरुन त्याला चांगाच राग आला. त्यातून त्याने पंचानाच मारहाण केली. (हेही वाचा, FIFA विश्वचषक 2022 साठी Miss Croatia Ivana Knoll चा मादक अंदाज, बोल्ड अंदाज पाहून व्हाल हैराण)

चिडलेल्या माथेफिरू फुटबॉलपटून पंचांना इतके ठोसे लगावले की, त्यामुळे पंचांना दोन दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही करावे लागले. पंचांना पुढच्या दोन सामन्यांसाठी स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. शारीरिक इजा झाल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.