IPL Auction 2025 Live

Euro 2020 Golden Boot Race: क्रिस्टियानो रोनाल्डोच्या स्थानाला Harry Kane पासून धोका, यूरो 2020 गोल्डन बूट शर्यतीत कोणाची आघाडी जाणून घ्या

13 जुलै, सोमवारी रात्री भारतीय वेळेनुसार 12.30 वाजता इटली आणि इंग्लंड फुटबॉल टीममध्ये वेम्बली स्टेडियम येथे विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. स्पर्धेच्या मानाच्या गोल्डन बूटच्या शर्यतीत असलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

युरो 2020 ट्रॉफी (Photo Credits : Getty Images)

EURO 2020 Golden Boot Contenders: यूरोपातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा, यूरो कॅप (Euro Cup) 2020 स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. 13 जुलै, सोमवारी रात्री भारतीय वेळेनुसार 12.30 वाजता इटली (Italy) आणि इंग्लंड (England) फुटबॉल टीममध्ये वेम्बली स्टेडियम येथे विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. ब्रिटिश संघाचा कर्णधार हॅरी केनने (Harry Kane) अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर इंग्लंडने डेन्मार्कचा 2-1 असा पराभव करत इटलीविरुद्ध 2020 च्या युरोपियन चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने साखळी फेरीत क्रोएशिया आणि चेक रिपब्लिक संघाला पराभवाची धुळ चारली आहे. तर स्कॉटलँड विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. खेळाच्या प्रत्येकी स्पर्धेप्रमाणे फूटबॉलमध्ये देखील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट (Golden Boot) पुरस्कार दिला जातो. (EURO 2020 Semi-final: इंग्लंडची 55 वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात, Harry Kane याच्या गोलने डेन्मार्कचा 2-1 असा पराभव; फायनलमध्ये Italy संघाशी लढत)

युरोपियन चॅम्पियनशिपचा आता अंतिम सामना शिल्लक असताना स्पर्धेच्या मानाच्या गोल्डन बूटच्या शर्यतीत असलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. या यादीत आघाडीवरील नाव म्हणजे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) आहे. रोनाल्डोने यंदाच्या स्पर्धेत 5 गोल केले आहेत. त्यानंतर झेक प्रजासत्ताकच्या पेट्रिक शिकने 5 गोल करत रोनाल्डोसह संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले आहे. शिवाय, लिस्टमध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन 4 करून संयुक्तपणे चौथ्या स्थानावर विराजमान आहे. हॅरी केन सोबत बेल्जियमच्या रोमॅलु लुकाकू, फ्रान्सचा करीम बेंझेमा आणि स्वीडनचा एमिल फोर्सबर्ग यांनी देखील प्रत्येकी 4 गोल केले आहेत. अशास्थितीत ब्रिटिश कर्णधार हॅरी केनकडे फायनल सामन्यात इटली विरोधात गोल करून पोर्तुगालच्या रोनाल्डोला मागे टाकून गोल्डन बूट पटकावण्याची सुवर्ण संधी आहे.

पोझिशन प्लेअर टीम गोल असिस्ट
1 क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगाल 5 1
2 पेट्रिक शिक झेक प्रजासत्ताक 5 0
3 रोमॅलु लुकाकू बेल्जियम 4 0
4 करीम बेंझेमा फ्रान्स 4 0
5 एमिल फोर्सबर्ग स्वीडन 4 0
6 हॅरी केन इंग्लंड 4 0

या स्पर्धेच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच युरोपियन चॅम्पियनशिप अनेक शहरांमध्ये खेळली गेली आहे. आश्चर्यकारकपणे, 2012 मध्ये रोनाल्डो, फर्नांडो टोरेस, मारिओ बालोतेली, मारिओ गोमेज, मारिओ मॅन्डझुकिक आणि अ‍ॅलन डॅझागोएव्ह यांनी प्रत्येकी तीन गोल नोंदवून वैयक्तिक पुरस्कार पटकावला होता.