FIFA World Cup 2022: आज इंग्लंड विरुध्द इराण तर सेनेगल विरुध्द नेदरलँड्स सामना, कोण मारणार बाजी?

त्यानंतर अल थुमामा येथील अल थुमामा स्टेडियमवर सेनेगलचा विरुध्द नेदरलँड्स असा सामना रंगणार आहे.

FIFA World Cup trophy (Photo credit: Wikipedia)

FIFA विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) च्या पहिल्या सामन्यात इक्वेडोरने कतारचा 2-0 ने पराभव केला. आज दोहा (Doha) येथील खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर (Khalifa International Stadium) विश्वचषकाच्या पुढील सामन्यात इंग्लंड विरुध्द इराण (England Vs Iran) अशी लढत होणार आहे. त्यानंतर अल थुमामा (Al Thumama Stadium) येथील अल थुमामा स्टेडियमवर सेनेगलचा विरुध्द नेदरलँड्स (Senegal Vs Netherlands) असा सामना रंगणार आहे. दोन्ही सामान्यांबाबत फुटबॉल (Football) चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पेटली आहे. आजचा सामना कोण जिंकणार फक्त यावरचं चर्चा सुरु आहे. विश्वचषकातील हे अगदीचं सुरुवातीचे सामने असलेत तरी हे सामने पॉईंट वाढवण्यास आणि उपात्यपूर्व फेरी गाठण्यास मोठी मदत होते.  इंग्लंडसह इराण फुटबॉल टीमचे (Football Team) जगभरात विविध चाहते आहेत तर सेनेगल विरुध्द नेदरलॅंड्स  या सामन्याची उत्सुकता देखील करोडो फुटबॉल फॅन्सला (Football Fans) आहे. आज सकाळपासूनच FIFA विश्वचषक 2022 ट्विटरवर ट्रेण्ड होताना दिसत आहे.

 

FIFA विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) इंग्लंड विरुद्ध इराण (England Vs Iran) सध्याकाळी 6:30 वाजता तर सेनेगल विरुद्ध नेदरलँड (Senegal Vs Netherlands) सामना संध्याकाळी 9:30 PM वाजता होणार आहेत. हे दोन्ही सामने स्पोर्ट्स 18 (Sports 18) आणि स्पोर्ट्स 18 एचडी (Sports 18 HD) चॅनेलद्वारे भारतीय टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. तरी तुम्ही स्पोर्टस १८ च्या माध्यमातून घरबसल्या फुटबॉल विश्वचषकाचा आनंद लुटू शकता. (हे ही वाचा:- IND vs NZ 2nd T20: सूर्याच्या मुलाखती दरम्यान ऋषभ पंतची मध्येच एंट्री, मागून मारली मिठी (Watch Video))

 

तर उद्याच्या सामन्याची वाट तर संपूर्ण जग बघत आहे कारण इद्या अल रेयान (Al Rayyan) येथील अहमद बिन अली स्टेडियमवर (Ahmad bin Ali Stadium) यूएसए (USA) विरुध्द वेल्स (Wales) सामना रंगणार आहे. दरम्यान हॅरी केन (Harry Kane), फिल फोडन (Phil Foden), मेम्फिस डेपे (Memphis Depay) आणि व्हर्जिल व्हॅन डायक (Virgil Van Dijk) यांना विश्वचषकात बघण्यासाठी चाहते स्टेडियमवर गर्दी करतील.