लॉकडाउनमध्ये इंग्लंड फुटबॉलपटू Dele Alli याला चाकूचा धाक दाखवून लूटले, हल्ल्यात खेळाडू आणि भाऊ जखमी- रिपोर्ट
हल्लेखोर शेकडो हजार पौंड किमतीची मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाले, अशी माहिती ब्रिटीश मीडियाने दिली आहे. या घटनेत 24 वर्षीय अली आणि त्याचा दत्तक घेतलेला भाऊ हॅरी हिकफोर्ड यांना दुखापत झाली.
टॉटनहम हॉटस्पर आणि इंग्लंडचा मिडफिल्डर डेल अल्ली (Dele Alli) याला बुधवारी पहाटे उत्तर लंडनच्या घरी चाकूचा धाक दाखवून लुटले गेले. हल्लेखोर शेकडो हजार पौंड किमतीची मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाले, अशी माहिती ब्रिटीश मीडियाने दिली आहे. या घटनेत 24 वर्षीय अली आणि त्याचा दत्तक घेतलेला भाऊ हॅरी हिकफोर्ड (Harry Hickford) यांना दुखापत झाली. चाकू घेऊन दोन जणांनी बार्नेटमधील खेळाडूच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना धमकावले. यावेळी त्यांनी घरात तोडफोड देखील केली. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पळ काढण्यापूर्वी दोन पुरुषांनी प्रॉपर्टीमध्ये प्रवेश केला आणि घड्याळांसह दागिन्यांच्या वस्तू चोरून नेल्या. त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर दोन पुरुष रहिवाशांच्या चेहर्याला किरकोळ दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात उपचाराची आवश्यकता नव्हती. अटक नाही; परिस्थितीची चौकशी सुरूच आहे.” घटना घडली तेव्हा अली आणि हिकफोर्डच्या गर्लफ्रेंड्स तसेच एक मित्रही घरात होते, असे अहवालात म्हटले आहे. दरोडेखोर घुसले तेव्हा ते ताश खेळत होते. (Lockdown: लॉकडाउन दरम्यान रिद्धिमान साहा याच्या घरी चोरीचा प्रयत्न, गाडीतून आलेले सहाही चोर गाडीतून फरार)
“सर्व संदेशाबद्दल धन्यवाद,” अलिने ट्विटरवर लिहिले. “भयानक अनुभव पण आम्ही आता सर्व ठीक आहोत. समर्थनाचे कौतुक.” टोटेनहॅमने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही डेल आणि त्याच्याबरोबर आयसोलेशनमध्ये असणार्त्यांना आमचा पाठिंबा देत आहोत. पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी आम्ही कुणालाही माहिती असलेल्या व्यक्तीस प्रोत्साहित करतो.”
कोरोना व्हायरसनंतर जूनमध्ये प्रीमियर लीग सामन्यांच्या संभाव्य पुनरुत्थान होण्याआधी अली पुढच्या आठवड्यात स्पर्सबरोबर प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी येणार आहे. दरम्यान अलीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. मार्चमध्ये, अलीच्या स्पर्स संघातील सहकारी जॅन व्हर्टोंगेंच्या कुटुंबियांना चँपियन्स लीगच्या कर्तव्यावर असतानाच त्यालाही चाकूची धाक दाखवून लुटले गेले होते.