East Bengal फुटबॉलपटूच्या चिमुकलीला कोविड-19 रुग्णांचे कारण सांगत रुग्णालायंनी नाकारला प्रवेश
कोविड-19 रूग्णांच्या उपचारामध्ये बहुतेक शहरांची रुग्णालये व्यस्त असल्याने कोलकाता येथील लायबेरियन फुटबॉलपटू अंशुमान क्रोमाह आणि त्याच्या पत्नीला आजारी असलेल्या नवजात मुलीला वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागला. शनिवारी त्याच्या नवजात मुलीमध्ये कावीळ होण्याची चिन्हे दिसू लागली.
कोविड-19 (COVID-19) रूग्णांच्या उपचारामध्ये बहुतेक शहरांची रुग्णालये व्यस्त असल्याने कोलकाता येथील लायबेरियन फुटबॉलपटू अंशुमान क्रोमाह (Ansumana Kromah) आणि त्याच्या पत्नीला आजारी असलेल्या नवजात मुलीला वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागला. बिंदू, (Bindu) या फुटबॉलपटूच्या काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीची आता प्रकृती सुधारली असून, त्याची पत्नी पूजाने मुलगी पार्क स्ट्रीट रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. गेल्या वर्षी कलकत्ता फुटबॉल लीगमधील (Calcutta Football League) ऐतिहासिक स्पर्धेदरम्यान पीयरलेस एससीचे (Peerless SC) नेतृत्व करणारा क्रोमाह बुधवारी सकाळी बाप बनला, पण शनिवारी त्याच्या नवजात मुलीमध्ये कावीळ होण्याची चिन्हे दिसू लागली. क्रोमाह आणि पूजाने बिंदूला जन्म झालेल्या शंबाझार नर्सिंग होममध्ये नेले पण बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालयाने तिला भरती करण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीला दोन खासगी रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांनीही तिला दाखल करण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेप केल्यानंतर रविवारी रात्री मुलीला दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (धक्कादायक! Corona च्या पार्श्वभूमीवर लिवरपूल-एटलेटिको मैड्रिड फुटबॉल सामन्यामुळे अतिरिक्त 41 जणांचा मृत्यू)
"मी पूर्णपणे खचुन गेलो होतो. ती आमची पहिली मूल आहे आणि मध्यरात्री आम्ही जे अनुभवले एक भयानक स्वप्नासारखं होतं. मध्यरात्री मी माझ्या आजारी मुलीला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात गेलो पण कोणीही आमच्या मदतीला आले नाही," असे क्रोमाहने पीटीआयशी संवाद साधताना सांगितले. एका रुग्णालयाने त्यांच्याकडे फक्त कोविड-19 रूग्णांचा विभाग आहे, तर दुसर्याने त्यांच्याकडे रिक्त बेड नसल्याचे सांगितले. "या कोरोनाव्हायरस गोष्टीमुळे आता आमच्यासाठी हे खूप कठीण आहे. मी माझ्या मुलीसमवेत तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यापैकी एकाने आम्हाला प्रवेश नाकारण्यापूर्वी तीन तास बसवले," क्रोमाह म्हणाला.
सोमवारी सकाळी क्रोमा यांच्या मुलीची प्रकृती खालावली होती. मुलीला रक्त संक्रमण करण्याची तातडीची आवश्यकता होती परंतु तिचा रक्त गट एक दुर्मिळ, एबी पॉझिटिव्ह होता. 1958 नंतर प्रथमच बिग थ्री - मोहून बागान, इस्ट बंगाल आणि मोहम्मदान स्पोर्टिंग या क्लबबाहेर असलेल्या क्लबने पीरलेसला ऐतिहासिक सीएफएल अजिंक्यपद जिंकलेल्या क्लबचे क्रोमाहने नेतृत्व केले. क्रोमाहने सर्वाधिक 13 गोल केले आणि या कामगिरीने त्याला मागील हंगामात आय-लीगमधील पूर्व बंगाल संघात स्थान मिळवले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)