Mirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा
Karnam Malleswari नंतर मीराबाई ही दुसरी भारतीय महिला वेटलिफ्टर आहे जिने ऑलिंपिक मध्ये वेटलिफ्टिंग मध्ये मेडल मिळवलं आहे.
भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu)ने टोकियो ऑलिंपिक मध्ये रूपेरी कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवत टोकियो ओलिंपिक मध्ये पहिलं पदक मिळवले आहे. यानंतर मणिपूर या तिच्या मूळ गावापासून देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशामध्येच Domino's India ने मीराबाईसाठी खास ऑफर दिली आहे. मीराबाई चानूने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि डोमिनोजने तिला आजन्म मोफत पिझ्झा देण्याची माहिती दिली आहे. Mirabai Chanu Road to Tokyo Glory: मणिपूरची मीराबाई कशी ठरली भारताची सिल्व्हर गर्ल, जाणून घ्या तिच्या प्रवासाची कहाणी.
दरम्यान रूपेरी कामगिरीनंतर NDTV शी बोलताना, मीराबाईने आपण खूप दिवस पिझ्झा खाल्लेला नाही. आता पिझ्झाचा आस्वाद घेणार असल्याचं म्हटलं आहे. यावरूनच @gitartha_k या ट्वीटर युजर ने 'मीराबाई भारतात येताच Domino's तुम्ही तिला पिझ्झा द्या मी बिल भरेन असं ट्वीट केले होते त्याला प्रत्युत्तर देताना Domino's India ने ''तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं. आम्ही मीराबाईला पिझ्झाची वाट बघायला लावणार नाही. आता आम्ही तिला आजन्म मोफत पिझ्झा पुरवू.' असं म्हटलं आहे.
Karnam Malleswari नंतर मीराबाई ही दुसरी भारतीय महिला वेटलिफ्टर आहे जिने ऑलिंपिक मध्ये वेटलिफ्टिंग मध्ये मेडल मिळवलं आहे. मीराबाईचं या ऑलिंपिक मध्ये मेडल मिळवणं हे लक्ष्य होतं. त्यासाठी प्रयत्न करताना अनेक गोष्टींचा तिने त्याग केला आहे. मीराच्या कोचनेही याबद्दल आनंद व्यक्त करताना ती पुढेदेखील अशीच कामगिरी करेल आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान होईल असं म्हटलं आहे.