Diego Maradona Dies: 1986 वर्ल्ड कप फायनलमधील मॅराडोना यांचा 'तो' गोल ‘Hand of God’ म्हणून प्रसिद्ध, जाणून घ्या संपूर्ण कहाणी
फुटबॉल आयकॉन डिएगो मॅरेडोना यांनी आपले आयुष्य परिपूर्ण केले. मॅरेडोनाचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे त्याच्या मेक्सिको सिटीच्या अझटेका स्टेडियम 1986 फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड सामन्या दरम्यानचा प्रसिद्ध ‘हँड ऑफ गॉड’ क्षण. मॅरेडोना यांनी 1986 फीफा वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
फुटबॉल आयकॉन डिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे बुधवार 25 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 60व्या वर्षी निधन झाले. क्लब आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही फुटबॉलमध्ये ट्रॉफी आणि प्रशंसा मिळवत मॅरेडोना यांनी आपले आयुष्य परिपूर्ण केले. मॅरेडोनाचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे त्याच्या मेक्सिको सिटीच्या अझटेका स्टेडियम 1986 फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA World Cup) अर्जेंटिना (Argentina) आणि इंग्लंड (England) सामन्या दरम्यानचा प्रसिद्ध ‘हँड ऑफ गॉड’ (Hand of God) क्षण. नियमांनुसार मॅरेडोनाला स्पष्ट हँडबॉलसाठी 'येलो कार्ड' मिळायला हवे होते परंतु तंत्रज्ञानाच्या अभावामुळे रेफरींना स्पष्ट दिसले नाही ज्यामुळे अर्जेन्टिनाला गोल देण्यात आला. मॅरेडोना यांनी 1986 फीफा वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. अर्जेंटिनाने इंग्लंडवर 2-1 ने मात करत विजेतेपद पटकावलं. मॅरेडोना हा आतापर्यंतचा महान फुटबॉल खेळाडू मानलं जातं आणि फिफाने केलेल्या सर्वेक्षणात मॅरेडोना यांना पेलेसह ‘Player of the Century’ म्हणून संयुक्तपणे मत मिळाले. (Diego Maradona यांच्या निधनानंतर भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा, सौरव गांगुली यांनी वाहिली भावनिक श्रद्धांजली)
22 जून 1986 अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना मध्यांतरापर्यंत 0-0 असा बरोबरीत सुरु होता. मध्यांतरानंतर मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाकडून पहिला गोल झळकावला, पण गोल करताना मॅरेडोना यांचा हात बॉलला लागला होता. फुटबॉलच्या नियमानुसार मैदानातील पंचांनी मॅरेडोना यांना येलो कार्ड दाखवून गोल नाकारणं गरजेचं होतं मात्र मॅरेडोना यांचा हात बॉलला लागला हे पंचांच्या लक्षात आलं नाही शिवाय, त्यावेळी व्हिडीओ रेफरल सिस्टीमही उपलब्ध नसल्यामुळे मॅरेडोना यांनी केलेला गोल वैध ठरवण्यात आला. या गोलच्या आधारे अर्जेंटिनाने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. अखेरीस अर्जेंटिनाने 2-1 ने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामना संपल्यानंतर पत्रकारांनी मॅरेडोना यांना पहिल्या गोलविषयी विचारलं असता मॅरेडोना यांनी त्या गोलचं वर्णन Hands of God असं केलं होतं. मैदानावरील पंचांना मॅराडोना यांचा हात फुटबॉलला लागलेला दिसला नसला तरी मेक्सिकन फोटोग्राफर अलेजांड्रो ओजेडा यांच्या कॅमेऱ्यात मात्र मॅरेडोना यांची ही कृती कैद झाली होती. पाहा मॅराडोना यांचा 'Hands Of God' गोलचा तो काही न विसरला जाणारा क्षण:
दरम्यान, 2005 मध्ये, वर्ल्ड कप फायनलमधील तो गोल प्रत्यक्षात त्यांच्या हाताने केला असल्याचंमॅराडोना यांनी 'La Noche del 10' या प्रोग्रामवर कबूल केले. तथापि, तो गोल जागतिक फुटबॉलमधील सर्वात Iconic आणि वादग्रस्त क्षणांपैकी एक आहे - ज्याच्या बळावर अर्जेंटिनाने आजवरचा एकमेव विश्वचषक जिंकला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)