Footballer Neymar Coronavirus Positive: जगातील सर्वात महागडा फुटबॉल खेळाडू नेमार कोरना व्हायरस संक्रमित
त्यानंतर त्यांच्यात काही लक्षणे आढळून आली. त्यामुळे सर्वांनीच कोरोना व्हायरस चाचणी करुन घेतली. प्राप्त माहतीनुसार नेमार याची प्रकृती सध्या चांगली आहे. तसेच, कोरोना व्हायरस संक्रमित झाल्यानंत पाळायची सर्व तत्व, नियम (प्रोटोकॉल) तो पाळत आहे.
जागातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडा फुटबॉल खेळाडू नेमार (Neymar) कोरोनावायरस (Coronavirus ) संक्रमित (Footballer Neymar Coronavirus Positive) झाला आहे. त्याची कोविड-19 (Covid-19) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. नेमार हा पॅरिस सेंट-जर्मेन (Paris Saint-Germain-PSG) साठी फॉर्वर्डवर खेळतो. काही लक्षणं दिसू लागल्याने नेमार याने कोरोना विषाणू चाचणी केली. या चाचणीचा अहवाल 2 सप्टेंबरला पॉझिटीव्ह आला. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नेमार याच्यासोबत अर्जेंटीनाचा फुटबॉल खेळाडू एंजेल डी मारिया (Angel Di Maria) आणि लियोनार्डो पारेडेस (Leandro Paredes) यांचीही कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
नेमार आणि त्याचे काही मित्र इबिजा येथे सुट्टी सजरी करुन परतत होते. त्यानंतर त्यांच्यात काही लक्षणे आढळून आली. त्यामुळे सर्वांनीच कोरोना व्हायरस चाचणी करुन घेतली. प्राप्त माहतीनुसार नेमार याची प्रकृती सध्या चांगली आहे. तसेच, कोरोना व्हायरस संक्रमित झाल्यानंत पाळायची सर्व तत्व, नियम (प्रोटोकॉल) तो पाळत आहे.
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, पुढी 14 दिवस नेमार हा त्याच्या बोगीवल येथील घरात क्वारंटाईन राहणार आहे. कोरोना व्हायरस संसर्गामुळे 10 सप्टेंबरला होणाऱ्या हंगामातील पहिल्या PSG गेममध्ये नेमार सहभागी होणार नाही. PSG चा हा सामना लेन्स सोबत होणार होता.
Paris Saint-Germain ने ट्विट करुन म्हटले आहे की, त्यांचे तीन खेळाडू कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. त्यामुळे ते तिघेही हेल्थ प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. या सर्व खेळाडूंच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार आहे.