Coronavirus: टोकियो 2020 ऑलिम्पिक आयोजक समिती स्टाफ मेंबर कोविड-19 पॉझिटिव्ह

समितीच्या मुख्यालयात काम करणाऱ्या 30 च्या वयातील एका व्यक्तीची मंगळवारी सकारात्मक चाचणी झाली आणि त्याला घरी क्वारंटाइन ठेवण्यात आले, असे त्यात नमूद केले गेले.

टोकियो ऑलिम्पिक 2020 (Photo Credit: Getty)

कोविड-19 (COVID-19) चा प्रसार जगभरात वेगाने वाढत जात आहे आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळावर परिणामानंतर आता आयोजन समितीही याच्या जाळयात अडकली आहे. टोकियो 2020 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजन संस्थेच्या सदस्याची नवीन कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्ट सकारात्मक असल्याचे बुधवारी सांगितले. समितीच्या मुख्यालयात काम करणाऱ्या 30 च्या वयातील एका व्यक्तीची मंगळवारी सकारात्मक चाचणी झाली आणि त्याला घरी क्वारंटाइन ठेवण्यात आले, असे त्यात नमूद केले गेले. महिन्याच्या सुरुवातीला जपान सरकारने आपत्कालीन स्थितीची घोषणा केल्यापासून टोकियो 2020 खेळ समितीमधील अंदाजे 3,800 कर्मचारी घरातून काम करीत आहेत. मागील महिन्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर आयोजन समितीचे सदस्य पुनर्निर्धारित ऑलिम्पिकच्या योजनांवर काम करीत आहेत. (Coronavirus: इंग्लंडचे 76 वर्षीय फुटबॉल वर्ल्ड कप विजेता नॉर्मन हंटर कोरोनाशी झुंज हरले, देशात आजवर 13 हजार पेक्षा अधिक मृत्यूची नोंद)

समितीच्या निवेदनात म्हटले आहे की, "आयोजक समितीने ज्यांचा रूग्णाशी जवळचा संपर्क होता त्यांची ओळख पटवलीआणि आजपासून त्यांना घरी क्वारंटाइन केले आहे. जिथे व्यक्तीने काम केले तो मजला बंद करून तिथे निर्जंतुकीकरण केले जाईल." ऑलिम्पिक खेळांची सुरुवात यंदा जुलै महिन्यात होणार होती, मात्र व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता खेळ 2021 पुढे ढकलण्यात आले. दुसरीकडे, सध्या स्थिती पाहता पुढील वर्षी देखील खेळाच्या आयोजनावर स्पष्टता नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) म्हटले की टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, 2022 पर्यंत नाही, कारण पुढच्या वर्षी उन्हाळ्यानंतर यजमान जपान त्याचे आयोजन करू शकत नाही. न्यूज एजन्सी सिन्हुआने आयओसीच्या हवाल्याने सांगितले की समकक्ष आणि पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले की पुढच्या उन्हाळ्यात जपान त्याचे आयोजन करू शकत नाही. आयोजन समिती आणि संपूर्ण देशासाठी हे एक कठीण काम आहे.

जगभरात अडीच लाखाहून अधिक लोक या व्हायरसने संक्रमित झाले आहेत आणि कोरोना व्हायरसमुळे 172,927 लोक मरण पावले आहेत. जपानमध्ये कमीतकमी 12,000 जणांची व्हायरस टेस्ट सकारात्मक आली असून मंगळवारपर्यंत 276 जणांचा मृत्यू झाला आहे.



संबंधित बातम्या

ENG vs WI 4th T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या T20 मध्ये इंग्लंड विजयाची मालिका कायम ठेवणार, हेड टू हेड रेकॉर्ड, सामन्यापूर्वी लाईव्ह स्ट्रिमींगबाबत घ्या जाणून

ENG Beat WI 3rd T20I 2024: इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव करून मालिकेत घेतली 3-0 अशी अभेद्य आघाडी, इंग्लिश फलंदाजांचा शानदार खेळ

Imane Khelif: महिला असल्याचे भासवून ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी इमान खलीफ वैद्यकीय अहवालात निघाली पुरुष, पदक परत घेण्याची लोकांची मागणी

ENG vs WI 2nd ODI 2024 Preview: इंग्लंड संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा करेल सामना, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून