कोरोना दरम्यान BWF ने सुधारित कॅलेंडर केले घोषित, ऑलिम्पिक पात्रता असणाऱ्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे डिसेंबरमध्ये आयोजन

ऑलिम्पिक-पात्रता असणारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा आता बीडब्ल्यूएफने विस्कळीत-हंगाम वाचवण्यासाठी सुधारित कॅलेंडरचे अनावरण केल्यानंतर 8 ते 13 डिसेंबर दरम्यान आयोजित केली जाईल.

प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

कोरोनामुळे स्थगिती झालेली इंडिया ओपन बॅडमिंटन (India Open Badminton) स्पर्धा यंदा डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक-पात्रता (Olympic Qualification) असणारी इंडिया ओपन स्पर्धा आता बीडब्ल्यूएफने (BWF) विस्कळीत-हंगाम वाचवण्यासाठी सुधारित कॅलेंडरचे अनावरण केल्यानंतर 8 ते 13 डिसेंबर दरम्यान आयोजित केली जाईल. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, "24-29 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे होणारी वर्ल्ड टूर सुपर 500 स्पर्धा आता 8 ते 13 डिसेंबर दरम्यान होणार आहे." हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हैदराबाद ओपन (11 ते 16 ऑगस्ट) आणि सय्यद मोदी इंटरनेशनल (17 ते 22 नोव्हेंबर) यापूर्वी होणार आहे. त्यांच्या मूळ तारखांमधून तब्बल आठ स्पर्धा पुनर्निर्देशित करण्यात आल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंड ओपन सुपर 300, इंडोनेशिया ओपन सुपर 1000, मलेशिया ओपन सुपर 750, थायलंड ओपन सुपर 500 आणि चीनमधील वर्ल्ड टूर फायनल्स सारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचा समावेश आहे. (IND Tour Of SA 2020: टीम इंडियाच्या ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत कोणतीही वचनबद्धता नाही, BCCI ने फेटाळला CSA चा दावा)

“बॅडमिंटनच्या परतीसाठी योजना आखणे कठीण काम झाले आहे. अल्पावधीत बर्‍याच स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत पण आम्हाला विश्वास आहे की यामुळे आम्हाला पुन्हा सुरक्षित खेळ सुरू करण्याची चौकट उपलब्ध होईल," बीडब्ल्यूएफचे सरचिटणीस थॉमस लुंड यांनी म्हटले.

लुंड यांनी पुढे म्हणाले की सर्व काही सुरक्षित झाल्याशिवाय स्पर्धा पुन्हा सुरु केल्या जाणार नाही. “अशावेळी आंतरराष्ट्रीय देश आणि प्रांताद्वारे आंतरराष्ट्रीय मुमेंट व प्रवेशावरील निर्बंध कधी हटविले जातील हे सांगणे कठीण आहे, परंतु असे करणे सुरक्षित आहे हे पूर्णपणे स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही स्पर्धा पुन्हा सुरू करणार नाही." वर्ल्ड टूर स्पर्धेशिवाय, बीडब्ल्यूएफची प्रीमियर टीम स्पर्धा, थॉमस आणि उबर कप फायनल्स 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान डेनमार्कच्या आरहस येथे आयोजित केली जाईल. दहा निम्न-श्रेणीतील कार्यक्रम रद्द राहतील, तर जर्मन ओपन, स्विस ओपन, युरोपियन चँपियनशिप आणि ऑस्ट्रेलियन ओपन या चार निलंबित स्पर्धा योग्य तारखांच्या प्रतीक्षेत आहेत.