दिग्गज फुटबॉलपटू नेमारच्या 52 वर्षीय आईचे 22 वर्षांच्या मुलाशी प्रेमसंबंध, पाहा फुटबॉलरची प्रतिक्रिया
नेमारच्या 52 वर्षीय आई नादीनने सध्या एका 22 वर्षीय तरुणाला डेट करत असल्याची पुष्टी केली आहे. आपल्या आईच्या या नात्याची कबुली देताना नेमारने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकप्रिय म्हणानुसार ‘प्रेमात वयाची मर्यादा नसते' आणि ब्राझिलियन फुटबॉल सुपरस्टार नेमारची (Neymar) आई ही सर्वात ताजी उदाहरणे आहेत. ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार नेहमीच चर्चेत राहतो आणि आता त्याच्या आई चर्चेत आली आहे. ब्राझिलियन फुटबॉलर नेमार जूनियरची आई नादीन गोनकाल्विस (Nadine Goncalves) यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे त्या एका 22 वर्षाच्या मुलासह दिसत आहे. नेमारच्या 52 वर्षीय आई नादीनने सध्या एका 22 वर्षीय तरुणाला डेट करत असल्याची पुष्टी केली आहे. नादीन यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा तरुण नेमारपेक्षा सहा वर्ष छोटा आहे. गोनकाल्विसच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोवर मुलगा नेमार जूनियरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आईच्या या नात्याची कबुली देताना नेमारने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि असेही लिहिले आहे की, “आनंदी आई, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो.” नेमारच्या आईच्या प्रियकरचे नाव टियागा रामोस (Tiago Ramos) आहे.
25 वर्षांच्या संबंधनानंतर 2016 मध्ये नेमारचे पालक एकमेकांपासून विभक्त झाले. रामोसला देखील नेयमार आवडतो आणि त्याचा तो खूप मोठा चाहता आहे. महत्त्वाचं म्हणजे नादीन आणि टियागो यांच्या वयात 30 वर्षांचं अंतर असतानाही नेमारने त्यांच्या नात्याला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, फक्त नेमारच नाही तर त्याचे वडील रिबेरो यांनीही नादीनला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रामोसने सांगितले की त्याने त्याचा आयडल नेमारला 2017 मध्ये एक पत्रही लिहिले होते आणि ते म्हणाले, नेमार, तू सुंदर आहेस. मी तुमचा किती मोठा चाहता आहे हे कसे सांगावे हे मला समजत नाही. तुम्हाला भेटणे हे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती सारखे होईल.
यावेळी, कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा थांबविण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत फुटबॉल स्पर्धेवरही बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता फिफाने भारतात होणाऱ्या महिला अंडर-17 वर्ल्डकपलाही स्थगिती दिली आहे.