ब्राझिलचा फूटबॉल प्लेअर Bryan Borges साठी लेकीच्या जन्माचा क्षण ठरला खास; पत्नीला केली फूटपाथवर सुरक्षित प्रसुतीसाठी मदत!

ब्राझीलचा फूटबॉल प्लेअर Bryan Borges च्या आयुष्यात त्याचा मुलीचा जन्म खास ठरला आहे. 24 वर्षीय या खेळाडूने पत्नीच्या प्रसुतीमध्ये मदत केली.

ब्राझिलचा फूटबॉल प्लेअर Bryan Borges साठी लेकीच्या जन्माचा क्षण ठरला खास; पत्नीला केली फूटपाथवर सुरक्षित प्रसुतीसाठी मदत!
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

ब्राझीलचा फूटबॉल प्लेअर Bryan Borges च्या आयुष्यात त्याचा मुलीचा जन्म खास ठरला आहे. 24 वर्षीय या खेळाडूने पत्नीच्या प्रसुतीमध्ये मदत केली आहे. दरम्यान 26 वर्षीय Myllena ला अचानक त्रास सुरू झाल्याने घराबाहेर पडलेली Myllena घराजवळ असलेल्या फूटपाथवर आडवी झाली आणि काही मिनिटांतच त्यांच्या मुलीचा जन्म झाला. दरम्यान ही घटना नजिकच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे.

Bryan Borges आणि त्याची पत्नी Myllena ब्राझील मध्ये Recifeमध्ये राहते. 1 ऑक्टोबरला ते घराबाहेर पडले. गाडीच्या पार्किंग एरिया जवळ पोहचताच Myllena ला त्रास जाणवू लागला. तिला चालणं देखील कठीण झालं. दरम्यान तिला बाळाची चाहुल जाणवली आणि ती फूटपाथवरच आडवी झाली. Myllena ने फूटपाथवरच बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि Myllena ने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. त्यांनी मुलीचं नाव Cecilia ठेवलं आहे. Bryan Borges ने हा क्षण 'वंडरफूल' असल्याचं म्हटले आहे.

दरम्यान Bryan Borges ने त्याच्या मित्रपरिवाराच्या मदतीने प्रसुतीनंतर पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेले. दरम्यान या जोडप्याच्या बाळाचा जन्म Esperança Hospital maternity ward मध्ये होण्याचं प्लॅनिंग होते मात्र अचानक त्रास झाल्याने Borges दांपत्याच्या चिमुकलीने फूटपाथवरच जन्म घेतला.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2020 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).