माईक स्नाइडर चा पराभव करत विजेंदर सिंगने जिंकले प्रो-बॉक्सिंगचे सलग 11 वे जेतेपद
भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंग याने प्रो-बॉक्सिंग मध्ये आज पहाटे अमेरिकेच्या माइक स्नायडरचा पराभव करत बॉक्सिंग करियरमधील 11 वा विजय मिळवला आहे.
भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंग (Vijender Singh) याने प्रो-बॉक्सिंग (Pro-Boxing) मध्ये दमदार पुनरागमन केले आहे. वर्षभर रिंगपासून लांब राहिलेल्या विजेंदरने आज पहाटे अमेरिकेच्या माइक स्नायडरचा (Mike Snider) पराभव करत बॉक्सिंग करियरमधील 11 वा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर प्रो-बॉक्सिंगमध्ये पराभूत न होण्याचा विक्रमही त्याने कायम राखला आहे. विजेंदर आणि स्नायडरमधील सामना अमेरिकेच्या नेवार्क (न्यूजर्सी) येथे रंगला. राऊंडच्या मिडलवेट स्पर्धेत विजेंदरने स्नायडरला नॉकआऊट केलं. विजेंदरने प्रो-बॉक्सिंग करियरमध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यातील 8 सामन्यात तर त्याने नॉकआऊट पद्धतीने विजय मिळविला आहे.
दरम्यान, या सामन्यानंतर त्याने चाहत्यांचे आभार मानत या लढतीचा एक व्हिडिओ देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. 'गान अर्पित, प्राण अर्पित, रक्त का कण-कण समर्पित। चाहता हूं देश की धरती, तुझे कुछ और भी दूं।,' विजयानंतर त्याने अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.
विजेंदर याने नुकतेच काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र यात त्याला पराभव पत्कारावा लागला.