Avinash Sable qualifies for Paris Olympics 2024: अविनाश साबळे पॅरिस 2024 ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र, बीडच्या सुपुत्राची दमदार कामगीरी

तो मुळचा बीड जिल्ह्यातील असून लांब पल्ल्याचा धावपटू आहे. नुकतीच त्याने सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

Avinash Sable | (File Image)

Runner Avinash Sable Selected for 2024 Olympics: पॅरीस येथे 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पीक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच सुपुत्र अविनाश साबळे पात्र झाला आहे. तो मुळचा बीड जिल्ह्यातील असून लांब पल्ल्याचा धावपटू आहे. नुकतीच त्याने सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याला जगभरातील क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेल्या पॅरीस ऑलिम्पीक स्पर्धेसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करण्यात यश आले आहे.

पोलंड येथे रविवारी (16 जुलै) पार पडलेल्या सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये अविनाश याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सहावे स्थान पटकावले. त्याने 8:11.63 ही वेळ नोंदवली. ही स्पर्धा त्याने एकूण 8 मिनीटे 11.63 सेकंदामध्ये पूर्ण केली. त्याने हे अंतर पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीफलचेस स्पर्धेत गाठले आहे. ज्यामुळे त्याला दुसऱ्यांदा ऑलिम्पीकची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही स्पर्धा ऑगस्ट 2024 मध्ये पॅरीस येथे पार पडणार आहे. ज्यामध्ये तो अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होईल.

अनिवाश साबळे याने या पूर्वी टोकियो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (Commonwealth Games 2022) सहभाग घेतला आहे. त्या वेळीही त्याने चमगदार कामगिरी केली होती. दरम्यान, पॅरीस येथील स्पर्धेसाठी निवड झाल्याने अविनश याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ऑलिम्पिक ही एक प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. जी दर चार वर्षांनी होते. हे क्रीडा आणि विषयांच्या विस्तृत श्रेणीमध्ये स्पर्धा करण्यासाठी जगभरातील विविध देशांतील खेळाडूंना एकत्र आणते. आधुनिक ऑलिम्पिक खेळ हे प्राचीन ऑलिंपिक खेळांपासून प्रेरित होते, जे ग्रीसमधील ऑलिंपिया येथे इ.स.पूर्व ८ व्या शतकापासून ते चौथ्या शतकापर्यंत आयोजित करण्यात आले होते.

आधुनिक ऑलिम्पिक खेळांचे 1896 मध्ये पुनरुज्जीवन करण्यात आले आणि तेव्हापासून जागतिक युद्धांमुळे काही अपवाद वगळता ते नियमितपणे आयोजित केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ही ऑलिम्पिक खेळांचे आयोजन आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार प्रशासकीय संस्था आहे. ऑलिम्पिकच्या प्रत्येक आवृत्तीसाठी यजमान शहराची निवड बोली प्रक्रियेद्वारे केली जाते.

ऑलिम्पिक गेम्समध्ये उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन्ही आवृत्त्या आहेत, ज्या दर दोन वर्षांनी बदलतात. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये अॅथलेटिक्स, पोहणे, जिम्नॅस्टिक्स, सॉकर, बास्केटबॉल आणि इतर अनेक खेळांच्या विविध श्रेणींचा समावेश होतो. हिवाळी ऑलिंपिक हिवाळी खेळ जसे स्कीइंग, स्नोबोर्डिंग, आइस हॉकी, फिगर स्केटिंग आणि बरेच काही यावर लक्ष केंद्रित करते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif