Lionel Messi's 'Anti-Coronavirus' Mattress: कोविड-19 दूर ठेवण्यासाठी बार्सिलोनाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलर लिओनेल मेस्सी 88,000 रुपयाच्या 'अँटी-कोरोना' मॅट्रेसवर झोपतो?

अर्जेंटिनाचा हा फुटबॉलर 900 डॉलर्स (88,000 रुपये किमतीच्या) अँटी-कोरोना व्हायरस मॅट्रेसवर झोपतो. अहवालानुसार, ही मॅट्रेस चार तासांत कोविड-19 विषाणूंचा नाश करते.

लियोनल मेस्सी (Photo Credit: Getty)

बार्सिलोनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या फुटबॉलपटूंपैकी एक आहे पण इतर सर्वांप्रमाणेच श्रीमंत सुपरस्टार फुटबॉलरला इतरांप्रमाणेच कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सामना करावा लागत आहे. कोविड-19 (COVID-19) काळात फुटबॉल सक्रिय झाले असताना, मेस्सीने स्वत:ला आणि आपल्या कुटूंबापासून हे संक्रमण दूर ठेवण्यासाठी एक अनन्य पाऊल उचलले आहे. अर्जेंटिनाचा हा फुटबॉलर 900 डॉलर्स (88,000 रुपये किमतीच्या) अँटी-कोरोना व्हायरस मॅट्रेसवर (Anti-Coronavirus mattress) झोपतो. अहवालानुसार, ही मॅट्रेस चार तासांत कोविड-19 विषाणूंचा नाश करते. ही मॅट्रेस मिळवणार अन्य फुटबॉलपटूंनपैकी बार्सिलोना स्टार फुटबॉलर एक आहे. The Sunमध्ये दिलेल्या वृत्तानुसार टेेक मूनच्या नवीनतम अँटी-कोरोना व्हायरस मॅट्रेसचा 33 वर्षीय फुटबॉलर मालक आहे. (अबब! क्रिस्टियानो रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी गाडी, किंमत जाणून पाहून तुम्हालाही घाम फुटेल)

अ‍ॅटलेटिको माद्रिदचा शौल निगुएज हा या कंपनीचा ब्रँड अँम्बेसेडर आहे आणि मेस्सीचा अर्जेंटिनाचा साथीदार सर्जिओ अगुएरो देखील त्याचा उपयोग करतो. या मॅट्रेसवर चार तास झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरावरील सर्व विषाणू नष्ट करण्याचा दावा केला जातो. बार्सिलोना किंवा जगातील इतर व्यावसायिक क्लबमधील सर्व खेळाडू नियमितपणे कोविड-19 टेस्ट करत असताना तर मेस्सी आपल्या कुटुंबासाठी संरक्षणासाठी एक पाऊल पुढे गेला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हे मॅट्रेसमध्ये 'व्हायरस क्लीन' नावाची प्रणाली वापरली जाते ज्याच्या ऊतींमध्ये अंतर्भूत नॅनोप्रिकल्सचा वापर व्हायरस आणि हानिकारक बॅक्टेरियांच्या 99 टक्के काढून टाकण्यात मदत होते. मॉडेलच्या आधारावर या मॅट्रेसमध्ये लेग मसाज करणे यासारखे इतर कार्य देखील आहेत जे मेस्सीच्या निफ्टी पायांचे संरक्षण करण्यास मदत करतील. दरम्यान, कोविड -19 च्या या संकटकाळात मेस्सीदेखील आपले काम करत आहे. व्हायरसविरूद्ध लढ्यात त्याने अर्जेंटिनाला मदत करण्यासाठी £440,000 ची देणगी दिली होती. क्लब आणि त्याचे साथीदार यांनीही बार्सिलोनामध्ये आपल्या वेतनात कपात केली आणि क्लबला त्यांचा खर्च कमी करण्यासाठी मदत करावी यासाठी की फुटबॉलने या महामारी पार्श्वभूमीवर पुढाकार घेतला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif