राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्रा स्वीकारताना खेळाडू (Photo Credits: Twitter)

Padma Awards 2019: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी आज फ्रीस्टाइल रेसलिंग (कुस्ती) मल्ल बजरंग पुनिया (Bajrang Punia), टेबल टेनिस स्टार शरत कमल (Sharath Kamal), भारतीय बुद्धीबळ ग्रैंडमास्टर हरिका द्रोनावल्ली (Harika Dronavalli) आणि कबड्डीपटू अजय ठाकुर (Ajay Thakur) यांना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri award)देऊन सन्मानित केले.

दरम्यान, या खेळाडूंसोबतच भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan), अभिनेता आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा (Prabhu Deva), दक्षिण भारतातील प्रसिद्ध ड्रमर शिवमणि (Sivamani), यांनाही पद्मश्री पुरस्कार Padma Shri award) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर, दक्षिण भारतातील आणखी एक सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांना पद्म भूषण (Padma Bhushan)पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पद्मश्री पुरस्कार हा भारत सरकारडून देशासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नागरिकाला दिला जातो. यात प्रामुख्याने कला, साहित्य, संगित, सामाजिक कार्य, उद्योग, विज्ञान, खेळ, संशोधन, समाजसेवा आणि सार्वजनिक जिवनात दिलेल्या योगदानाचा समावेस असतो. (हेही वाचा, Padma Awards 2019: सिनेसृष्टीतील शंकर महादेवन, प्रभुदेवा यांच्यासह दिग्गज कलाकार पद्म पुरस्काराने सन्मानित)

भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नागरी पुरस्कारांच्या क्रमवारीनुसार पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. त्याआधी भारत रत्न, पत्न विभूषण, आणि पद्म भूषण पुरस्काराचे स्थान असते. देवनागरी लिपीत या पुरस्काराचा उल्लेख करताना या पुरस्कारापुर्वी 'श्री' असे लिहिण्याची किंवा जोडण्याची पद्धत आहे. जसे की, पद्मश्री.