IPL Auction 2025 Live

Australian Open: रोहन बोपण्णा ठरला ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष, मॅथ्यू एबडेनसह दुहेरीचे विजेतेपद पटकावले

भारताच्या रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) हा ग्रँड स्लॅम विजेतेपद (Grand Slam title) पटकावणारा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरत इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपले नाव कोरले आहे. रॉड लेव्हर एरिना येथे शनिवारी 27 जानेवारी रोजी वयाच्या 43 व्या वर्षी बोपण्णाने ब्रिटनच्या मॅथ्यू एबडेनसह (Matthew Ebden) सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी या इटालियन जोडीचा 7-6 (7-0), 7-5 असा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.  बोपण्णाने 40 वर्षे 270 दिवस वयाच्या मार्सेलो अरेव्होलासोबत फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकणाऱ्या जीन-ज्युलियन रोजरचा विक्रम मोडला.

पाहा पोस्ट -

 

2012 मध्ये लिएंडर पेस आणि रॅडेक स्टेपनेक यांनी मेलबर्न पार्कमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते यानंतर ऑस्ट्रेलियान ओपनमध्ये  ही दुसरी वेळ आहे. पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा रोहन बोपण्णा हा दुसरा खेळाडू ठरला आहे.

पाहा वीवीएस लक्ष्मणची पोस्ट -

दरम्यान रोहण बोपन्नाच्या या विजयानंतर  अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा या दिल्या आहेत. विरेंद सेहवाग, विविएस लक्ष्मण आणि रॉबिन उथप्पा यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. बोपन्नाला शुभेच्छा देताना लक्ष्मणने लिहले आहे की, वय हा एक फक्त नंबर आहे.