Australian Open: ऍश्ले बार्टीने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले

आजवरच्या 44 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी एशले बार्टी ( Ashleigh Barty Wins Women's Singles Title) ही पहिली महिला ठरली आहे.

Ashleigh Barty | (Photo Credit - Insta)

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टीने (Ashleigh Barty) ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात बार्टीने अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सचा पराभव करत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपदावर नाव कोरले आहे. आजवरच्या 44 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी ऍश बार्टी ( Ash Barty Wins Women's Singles Title) ही ऑस्ट्रेलियाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

रॉड लेवर एरिना येथे खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात या ऑस्ट्रेलियायी खेळाडूने अमेरिकेच्या कॉलिन्स हिला थेट सामन्यात 6-3, 7-6 अशा फरकांनी पराभूत केले. एशले बार्टी पाठिमागील 44 वर्षांमध्ये अशी पहिली खेळाडू ठरली आहे. जिने ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकला आहे. बार्टी आगोदर हा किताब माजी टेनिस स्टार क्रिस ओ'नील ने ऑस्ट्रेलियन ओपन एकल ट्रॉफीवर नोव कोरत मिळवला होता. (हेही वाचा, Ronaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट)

 

View this post on Instagram

 

A post shared by Australian Open (@australianopen)

ऑस्ट्रेलियन ओपन 2022 हा सामना महिला एकेरीमध्ये जगातील दोन अव्वल महिला टेनिस खेळाडू एशले बार्टी आणि डेनियल कॉलिंस यांच्यात झाला. एश्ले पार्टी हिने अमेरिकेच्या मॅडीसन कीज हिला थेट सामन्यांमध्ये पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दरम्यन, कॉलिन्सने मोठा फेरबदल करत इगा स्वियातेक हिला थेट सामन्यांमध्ये 6-4, 6-1 अशा फरकाने टक्कर दिली. 42 वर्षांनंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश करणारी एशले बार्टी ही पहिली ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू ठरली होती. एशले बार्टी हिच्याकडे संपूर्ण देशवासीयांच्या अपेक्षा होत्या. तर जगभरातील चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. त्यामुळे 1978 नंतर ऑस्ट्रेलियाई ओपन किताब जिंकून देशाला नववर्षातील मोठे गिफ्ट द्यावे अशा तिच्याकडून अपेक्षा होत्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif