Australian Open 2020: नोवाक जोकोविच याने 8 व्यांदा जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद, डोमिनिक थीम ला पराभूत करत मिळवले 17 वे ग्रँड स्लॅम

यासह त्याने रेकॉर्ड आठव्या वेळी या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. हे त्याचे 17 वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

नोवाक जोकोविच आणि डोमिनिक थीम (Photo Credits: Getty)

रविवारी वर्षाच्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमचा (Dominic Thiem) पराभव केला. यासह त्याने रेकॉर्ड आठव्या वेळी या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. हे त्याचे 17 वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये जोकोविचचा कधीही पराभव झाला नाही. पाच सेटच्या सामन्यात थीमला 6-4, 4-, 2-6, 6-3, 6-4 ने पराभव पत्करावा लागला. दोन्ही खेळाडूंमधील सामना 3 तास 59 मिनिटं चालला. जोकोविचने आठवे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद जिंकत पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. यापूर्वी त्याने 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019 मध्ये विजेतेपद जिंकले होते. 2011 ते 2013 या कालावधीत त्याने सलग तीन वेळा हे पदक जिंकले असून ओपन एराच्या बाबतीत हा एक विक्रम आहे. दोन्ही टेनिसपटू आतापर्यंत 11 वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये जोकोविचने 7 वेळा विजय मिळविला. मात्र, या दोघांमधील शेवटच्या 5 सामन्यात थाईम 4 वेळा यशस्वी झाला होता, परंतु आज जोकोविचने त्याचा पराभव केला. जोकोविचने 1 फ्रेंच ओपन (French Open), 5 विम्बल्डन (Wimbledon) आणि 3 यूएस ओपन (US Open) जेतेपदं जिंकली आहेत. सर्बियन खेळाडूने एकेरीत 78 जेतेपद जिंकले आहेत. त्याने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन व्यतिरिक्त विम्बल्डन जेतेपद जिंकले होते.

दुसरीकडे, 5 व्या मानांकित थीमने 16 एकेरी जेतेपद जिंकले आहेत. थीमची ही तिसरी ग्रँड स्लॅम फायनल होती आणि त्याला तिन्हीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्याने दोनदा (2018-2019) फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि 2016-2017 मध्ये उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रेलियन ओपनमधील हे त्याचे पहिले फायनल होते. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झेवरेव्हचा 3-6, 6-4, 7-6(3), 7-6(4) असा पराभव केला, तर जोकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 7-6, 6-4, 6-3 असा पराभव केला.

जोकोविच पहिला सेट जिंकला, तर थिएमने दुसरा आणि तिसरा सेट जिंकून जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील जोकोविचवर दबाव बनवला, मात्र सर्बियन खेळाडूने आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन शानदार पुनरागमन करत चौथा सेट जिंकला आणि सामना अंतिम सेटपर्यंत खेचला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif