Nandu Natekar Passes Away: अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
ते 88 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांना अर्जुन पुरस्कार (Arjuna Award Winner) देऊन गौरविण्यात आले होते.
भारतीय बॅडमिंटन (Badminton) विश्वाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन (Nandu Natekar Passes Awayझाले आहे. ते 88 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांना अर्जुन पुरस्कार (Arjuna Award Winner) देऊन गौरविण्यात आले होते. बॅडमिंटन खेळासोबत नाटेकर (Nandu Natekar) यांना इतरही अनेक खेळांमध्ये ऋची होती. भारताबाहेर विजेतपदक जिंकण्याचा पहिला बहुमानही नंदू नाटेकर यांच्या नावावर आहे. 1956 मध्ये त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटूही होते. त्यांच्या नावावर सहा आंतरराष्ट्रीय पदके आहेत.
नंदू नाटेकर हे मुळचे सांगलीचे. वयाच्या 20 व्या वर्षी 1953 मध्ये त्यांनी भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले. वैयक्तीक आणि सांघीक खेळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा 1954 मध्ये त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी बॅडमिंटन खेळात विविध प्रकारात विशेष नैपुण्यासह कामगिरी बजावली आहे. त्याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही नोंद घेण्यात आली आहे.1980 आणि 1981 मध्ये त्यांनी दुहेरी गटात खेळत दुसरे स्थान पटकावले. (हेही वाचा, Tokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी)
ट्विट
ट्विट
थॉमस चषकासाठी भारतीय बॅडमिंटन संघाकडून नंदू नाटेकर यांनी केलेली कामगिरी त्या वेळी विशेष गौरवली गेली. 16 एकेरी सामन्यांपैकी 12 सामने आणि दुहैरी सामन्यांतील 16 पैकी 8 सामने जिंकून त्यांनी 1951 आणि 1963 मध्ये भारताची जगभरातील क्रिडा वर्तुळाला दखल घ्यायला भाग पाडले.