Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाज दीपिका कुमारीने केला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; 6-4 असा जिंकला सामना
मिशेलनेही पुढच्या प्रयत्नात नऊ स्कोर केले. पण दीपिकाने पुनरागमन करत दोन्ही चांगले शॉट खेळले.
Paris Olympics 2024: भारताकडून तिरंदाजी खेळणाऱ्या दीपिका कुमारी (Archer Deepika Kumari) ने उपांत्यपूर्व फेरीत (Archery Quarter Final) धडक मारली आहे. या सामन्यात जर्मनीच्या मिशेलचा 6-4 असा पराभव झाला आहे. जर्मनीच्या मिशेलने पाचव्या सेटच्या सुरुवातीला 9 स्कोर केला, तर दीपिकाला केवळ 5 स्कोर करता आला. मिशेलनेही पुढच्या प्रयत्नात नऊ स्कोर केले. पण दीपिकाने पुनरागमन करत दोन्ही चांगले शॉट खेळले.
मिशेलने एकूण 27, तर दीपिकानेही 27 स्कोर केला. हा सेट बरोबरीत सुटला आणि दीपिकाने हा सामना 6-4 असा जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली. जर्मनीच्या मिशेलने चौथ्या सेटमध्ये पुनरागमन करत 29 स्कोर केले, तर दीपिकाला केवळ 27 स्कोर करता आला. मात्र, दीपिका अजूनही 5-3 ने आघाडीवर आहे. (हेही वाचा - Olympic Games Paris 2024: Manu Bhaker चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हॅटट्रिकचं स्वप्न भंगलं, 25 मीटर नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान!)
पहा व्हिडिओ -
उल्लेखनीय आहे की, तिसऱ्या सेटमध्ये मिशेलने 25, तर दीपिकाने 26 स्कोर करत तिसरा सेट जिंकला. अशाप्रकारे दीपिकाने 5-1 अशी आघाडी घेतली आहे. दीपिका आणि मिशेल यांच्यात दुसरा सेट सुरू झाला आहे. हा सेट दोन्ही तिरंदाजांमध्ये बरोबरीत सुटला. मिशेलने 27 स्कोर केला, तर दीपिकालाही तेवढाच स्कोर करता आला. मात्र, दीपिका सध्या मिशेलवर 3-1 अशी आघाडीवर आहे.