AFC Women's Asia Cup 2022: महाराष्ट्रात होणार आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा; जगभरातील 12 संघ होणार सामील

ही स्पर्धा आशिया खंडातील महिलांसाठीची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असून या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी सहभागी होणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन आधीच पात्र ठरले आहेत. इतर संभाव्य सहभागींमध्ये कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होणार आहे.

AFC Women's Asia Cup 2022: महाराष्ट्रात होणार आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा; जगभरातील 12 संघ होणार सामील
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी या उद्देशाने आशिया खंडातील  सर्वात मोठी एएफसी महिला आशिया कप 2022 (AFC Women's Asia Cup 2022) स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. क्रीडामंत्री केदार म्हणाले, एएफसी महिला आशिया कप 2022 या स्पर्धेमुळे राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. ही फुटबॉल स्पर्धा 20 जानेवारी 2022 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.

आपल्या राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम सर्व मापदंडांवर सुसंगत आहेत. राज्यात स्पर्धेसाठी आणि सरावासाठी अद्ययावत खेळपट्टी उपलब्ध असल्याचेही केदार यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध यंत्रणांना सूचित करण्यात येईल. यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, निवास अशा सर्व सुसज्ज सुविधा पुरविण्यात येईल. सर्व स्टेडियमच्या इमारतींची जर काही डागडुजी करणे गरजेचे असेल तर ती वेळेत करून घ्यावी, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.

ही स्पर्धा आशिया खंडातील महिलांसाठीची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असून या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी सहभागी होणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन आधीच पात्र ठरले आहेत. इतर संभाव्य सहभागींमध्ये कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होणार आहे. याकरिता खेळाचे मैदान सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2021 10:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).