Tokyo Olympic Stadium वर Uzbek च्या 30 वर्षीय तरूणाला महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक
दरम्यान याबाबतचं वृत्त मीडीयाने पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे.
Tokyo Olympic ची धूम येत्या काही दिवसांत रंगायला सुरूवात होणार आहे. पण त्याआधी काही दिवस Tokyo Olympic Stadium मधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 30 वर्षीय एका Uzbek च्या व्यक्तीला एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान याबाबतचं वृत्त मीडीयाने पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे.
Davronbek Rakhmatullaev असं या व्यक्तीचं नाव असून तो विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याच्यावर विशीमधील एका स्त्रीवर बलात्काराचे आरोप आहेत. ही माहिती देताना Tokyo Metropolitan Police Department कडून स्थळ गुपित ठेवण्यात आले आहे.
Olympic opening ceremony ची रिहर्सल पाहताना हा प्रकार घडला आहे. यावेळी आरोपीची जॅपनीज महिलेशी ओळख झाली आणि त्यानंतर स्टेडियम मध्ये तिच्यावर अत्याचार झाला. असे लोकल मीडीयाचे रिपोर्ट्स आहेत. Kyodo News च्या माहितीनुसार दोघेही ओलिंपिक गेमसाठी पार्ट टाईम काम करत होते. दरम्यान आरोपीने बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत. Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना दिले Anti-Sex Beds? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या बातमी मागील सत्य.
कोरोनाच्या सावटाखाली Tokyo Olympic ची सुरूवात शुक्रवारी होणार आहे. Japan National Stadium वर यंदा ओपनिंग आणि क्लोझिंग सेरेमनी सोबतच फूटबॉलची फायनल आणि काही सामने रंगणार आहेत. यंदा स्टेडियम हे प्रेक्षकांशिवायच ओलंपिकचे सामने पार पाडणार आहे.