Olympic Games Paris 2024 Google Doodle: ऑलिंपिक्स ची आज पासून सुरूवात; Google ने साकारलं खास डूडल!

2021 मध्ये टोकियो मध्ये पार पडलेल्या ऑलिंपिक्स मध्ये भारताने 7 पदकं जिंकली होती.

Google Doodle Paris | Google Home Page

ऑलिम्पिक गेम्स पॅरिस २०२४ (Olympic Games Paris 2024) ची सुरूवात आज 26 जुलै पासून होणार आहे. यापार्श्वभूमीवर आज गूगलच्या होमपेज वर खास ऑलिंपिक्स (Olympics) डूडल साकारण्यात आलं आहे. पहिल्यांदाच या ऑलिंपिक्स ची सुरूवात स्टेडियममध्ये नव्हे, तर हजारो ॲथलीट्सनी पॅरिस मधील प्रसिद्ध नदी Seine मध्ये तरंगत समारंभ सुरू केला आहे. डूडलमध्येही Seine मध्ये तरंगणारी ॲनिमेटेड पात्रे देखील दाखवण्यात आली आहेत.

आज, यजमान राष्ट्राच्या नेत्याच्या भाषणासह, काही सेलिब्रेशनने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सहभागी देशांतील खेळाडूंचे प्रदर्शन करणाऱ्या परेडनंतर ज्योत प्रज्वलित केली जाईल.

फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये 32 क्रीडा शाखांमधील 329 स्पर्धांमध्ये 200 हून अधिक देशांतील खेळाडूंचे आयोजन करण्यात आले आहे. आज सुरू होणारे हे ऑलिम्पिक 11 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहेत. या वर्षीच्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये 28 पारंपारिक ऑलिम्पिक खेळांव्यतिरिक्त चार नवीन क्रीडा स्पर्धा सादर केले जाणार आहेत ज्यामध्ये ब्रेकिंग, स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. Paris Olympic Games 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची दमदार सुरुवात, तिरंदाजीमध्ये महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक.

ऑलिंपिक्स मध्ये यंदा भारताकडून 117 खेळाडूंचा समावेश आहे. 2021 मध्ये टोकियो मध्ये पार पडलेल्या ऑलिंपिक्स मध्ये भारताने 7 पदकं जिंकली होती. यात भालाफेक मध्ये नीरज चोप्राची कामगिरी भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी होती.