फटाके वाजवणाऱ्यांवर टीका केल्याने इरफान पठाण झाला ट्रोल, भारतीय गोलंदाजाने नेटकऱ्यांना दिलं चोख प्रत्युत्तर

पण भारतातील काही लोकांनी फटाके जाळले. यावर इरफान पठाणने आपल्या ट्विटर अकाउंटवर फटाके फोडणार्यावर टीका केल्याने यूजर्सने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. इरफानने यूजर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांचीही दांडी उडवली.

इरफान पठाण (Photo Credit: IrfanPathan/Instagram)

चीनमधून उद्भवलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभर पाय पसरवले आहे. 21 दिवस लॉकडाउन असूनही भारतात (India) कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे.चिंताजनक वातावरण हलकं करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दीप लावण्यास सांगितले होते. पण भारतातील काही लोकांनी फटाके जाळले आणि पर्यावरण दूषित केले. यावर इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, "लोकं फटाके जाळण्यास सुरुवात करेपर्यंत सर्व काही छान दिसत होते." भाविकांना ते मान्य होऊ शकले नाही आणि त्यांनी इरफानला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या विरोधात एकता दर्शविण्यासाठी लोकांना सांगितले होते पण काही लोकांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली आणि वातावरण बिघडवले. पठाणने सोशल मीडियावर फटाके फोडणार्यावर टीका केल्याने यूजर्सने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. (Coronavirus: फटाके फोडल्यावरून भाजप खासदार गौतम गंभीर नाराज, म्हणाला-'ही उत्सव साजरा करण्याची वेळ नाही')

यूजर्सनी गलिच्छ भाषा वापरुन इरफानला ट्रोल केले. इरफानने स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर यूजर्सच्या टिप्पण्यांचा स्क्रीनशॉट शेअर केला. पठाण मुस्लिम असल्याबद्दल लोक भाष्य करीत असल्याचे आपण पाहू शकतो. इरफानने यूजर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांचीही दांडी उडवली. इरफानने कॅप्शनमध्ये लिहिले, "फटाके भरलेल्या ट्रकची गरज आहे, तुम्ही मदत कराल का?"

चीन, अमेरिका, इटली, ब्रिटन यासारख्या विकसित देशांमध्ये कोरोनाने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. पण आता भारतातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. भारतात 4000 हुन अधिक लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असून 114 हुन जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले असूनही, लोक स्वीकारत नाहीत आणि घराबाहेर पडत आहेत, कोरोनाचा प्रसार होण्याचे हे एक मोठे कारण आहे.