‘My India Isn’t Broken’: हर्षा भोगले यांनी CAA मुद्यांवरुन विरोध करणाऱ्या ट्रोलर्सना दिले जोरदार प्रत्युत्तर
सोशल मीडियावरील प्रख्यात क्रिकेट विश्लेषक आणि भाष्यकार हर्षा भोगले यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत देशभरात होणार्या निषेधावर आपले मत प्रदर्शित केले आहे. याच्यावर ऑस्ट्रेलियन पत्रकार डेनिस फ्रीडमॅनने हर्षाचे कौतुक केले आणि भारताविषयी काही टिप्पण्या केल्या, ज्या भोगलेंना अजिबात आवडले नाही आणि त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
सोशल मीडियावरील प्रख्यात क्रिकेट विश्लेषक आणि भाष्यकार हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत (Citizenship Amendment Act) देशभरात होणार्या निषेधावर आपले मत प्रदर्शित केले आहे. याच्यावर काही लोकांनी त्यांना ट्विटरवर ट्रोल केले तर काही लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. या दरम्यान, ऑस्ट्रेलियन पत्रकार डेनिस फ्रीडमॅनने (Dennis Freedman) हर्षाचे कौतुक केले आणि भारताविषयी काही टिप्पण्या केल्या, ज्या भोगलेंना अजिबात आवडले नाही आणि त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कायद्याचे समर्थक आणि असमर्थक रस्त्यावर उतरले आहेत आणि तरुणांना काय म्हणायचे आहे ते सरकारने ऐकले पाहिजे, असे भोगले यांनी सांगितले. डेनिसने यावर हर्षाचे कौतुक केले, पण त्याची एक टिप्पणी भोगलेंना पसंद पडली नाही. डेनिस पाकिस्तान क्रिकेटशी खास जोडलेले आहेत आणि सोशल मीडियावरील बर्याच पोस्ट फक्त पाकिस्तान क्रिकेटलाच पाठिंबा देताना करतात. (CAA Protest: चिंतित इरफान पठाण, आकाश चोप्रा यांनी CAA च्या निषेधांमुळे जामिया विद्यार्थ्यांविषयी चिंता व्यक्त केले Tweet)
हर्षाने फेसबुकवर एक फोटो शेअर केली, ज्याच्यावर डेनिसने प्रतिक्रिया देत लिहीले की, "मी फक्त या पोस्टसाठी हर्षासाठी टाळ्या वाजवू शकतो. त्यांचा भारत तुटलेला आहे. दुसर्या देशाचा नेता किंवा सत्तेत असलेल्या सरकारची सतत नाझीशी तुलना केली जात नाही. या मुद्यावर आपण सर्वांनी हर्ष असणे आवश्यक आहे. गौतम गंभीर वगळता. त्यांनी या पक्षाचा भाग होण्याचे ठरविले." भोगलेने ट्विटरवर डेनिसना चोख प्रत्युत्तर दिले आणि लिहिले- "नो डेनिस, माझा भारत मोडला नाही. हा उत्साही तरुणांचा देश आहे जो महान गोष्टी करतो. आम्ही पूर्णपणे कार्यशील आणि परिपक्व लोकशाही आहोत. आमचा काही मुद्द्यांवर मतभेद करू शकतो आणि आपले मत असू शकतो परंतु आपण सर्व भारतीय आहोत. आपण तुलनासाठी वापरलेला शब्द, कधीही नाही."
देशात सध्या सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर भोगले हे एकमेव क्रिकेटपटू नाहीत. यापूर्वी जामिया मिल्लिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणार्या केलेल्या पोस्टसाठी अष्टपैलू इरफान पठाण यांच्यावर टीका करण्यात आली होती, त्यानंतर यूजर्सने त्यांना धारेवर धरले होते. पण, इरफानने त्यांना प्रतिसाद देत त्यांची बोलती बंद केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)