MI IPL 2020 Schedule: पाचव्या विजेतेपदासाठी Mumbai Indians ने कंबर कसली, जाणून घ्या आणि डाउनलोड करा रोहित शर्माच्या टीमचे संपूर्ण वेळापत्रक

2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये टीमने आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. आणि आता त्यांनी पाचव्या विजेतेपदासाठी कंबर कसली आहे.मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक PDFमध्ये पाहा आणि मोफत डाउनलोड करा. 

Mumbai Indians New Jersey for IPL 2020 (Photo Credits: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सर्वात यशस्वी संघ आहे. 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये टीमने आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीमने हा पराक्रम केला आहे आणि आता टीम संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे आयोजित होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL) पाचवे विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. कोविड-19 ने आयपीएलला भारताच्या बाहेर युएईला नेण्यास भाग पडले, जिथे भारतातील सतत वाढणार्‍या प्रकरणांच्या तुलनेत सक्रिय कोरोना प्रकरणे फिकट पडली आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन करण्याची सुवर्णसंधी पाहून युएईने पुढाकार घेतला. क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपवून अखेरीस त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि अपेक्षेनुसार सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचे कठीण स्पर्धक चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) टक्कर देणार. यापूर्वी दोन्ही टीम आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. (IPL 2020 Schedule PDF: युएई येथे होणाऱ्या आयपीएल 13 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पाहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या सामन्यांचे संपूर्ण शेड्युल, वेळ आणि ठिकाण)

यंदा एकूण 10 डबल-हेडर सामने होणार आहेत आणि मुंबई इंडियन्स आपल्या 14 पैकी 13 सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता खेळणार आहे. सनरायजर्स हैद्राबाद विरोधात एक सामना दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. सुपर किंग्‍सचा सामना केल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स विरोधात उतरेल. मुंबई आज आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम बनली असली तरी पहिल्या पाच सीजनमध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. 2010 मध्ये मुंबई टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली मात्र टीमने पहिला किताब 2013 मध्ये मिळावला. मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक PDFमध्ये पाहा आणि डाउनलोड करा:

मुंबई इंडियन्स आयपीएल 2020 टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, मोहसीन खान, प्रिन्स बलवंत राय सिंह, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, जयंत यादव, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, ईशान किशन, आदित्य तरे, शेरफेन रदरफोर्ड, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, ट्रेंट बोल्ट, कीरोन पोलार्ड, नॅथन कोल्टर-नाईल आणि क्विंटन डी कॉक.