जगप्रसिद्ध टेनिपटूस शारापोवा करतेय करोडपती बॉयफ्रेंडला डेट
खरेतर मारियाच्या बॉयफ्रेंड्सची यादीही तशी भलतीच लांबलचक. त्यामुळे नेमकी ती कोणासोबत डेट करतीय हे कळणे तसे कठीणच. पण...
रशियाची सौंदर्यप्रधान टेनिसपटू मारिया शारापोवा सध्या तिच्या डेटींगमुळे चर्चेत आहे. अलिकडील काही काळात अलेक्झांडर गिलेक्ससोबतचे तिचे दर्शन वाढले आहे. खरेतर मारियाच्या बॉयफ्रेंड्सची यादीही तशी भलतीच लांबलचक. त्यामुळे नेमकी ती कोणासोबत डेट करतीय हे कळणे तसे कठीणच. पण, अलेक्झांडरसोबतचा फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर करुन तिने त्याच्यासोबतच्या मधूर संबंधावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.
मारियाच्या बॉयफ्रेंड यादीत अनेक नामवंत आणि तितक्याच लोकप्रिय व्यक्तिमत्वांचा समावेश आहे. २००८मध्ये तिने टीव्ही सेलिब्रेटी चार्ली एबरसोल याच्यासोबत विवाह केला होता. पण, कालांतराने तिची जवळीक प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर साशा वुजानिक सोबत वाढली. लवकरच ते एकत्रही आले. पण, त्यांचे हे नाते एक वर्षापेक्षा अधिक काळ टिकू शकले नाही. (हेही वाचा, शर्मिला निकोलेट: सोशल मीडियावर नेटीझन्सचा कलेजा खलास करणारी भारतीय वंशाची गोल्फर)
View this post on Instagram
Cali doesn’t want to say goodbye to summer
A post shared by Maria Sharapova (@mariasharapova) on
सन २००४मध्ये अवघ्या १७व्या वर्षी विम्बल्डन किताबावर नाव कोरत शारापोवा प्रसिद्धीच्या झोतात आली. २००६मध्ये तिने यूएस ओपनवरही नाव कोरले आणि ती जगज्जेती बनली. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार ती जगात सर्वाधिक कमाई करणारी एकमेव महिला खेळाडू होती. मारियाने अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांसाठी ब्रॅंड अंबॅसडर म्हणून काम केले आहे. गुगलवरही मारिया जोरदार चर्चेत असते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)