Manika Batra Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्रानं रचला इतिहास, राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश करणारी ठरली पहिली भारतीय टेबल टेनिसपटू
टेबिल टेनिसच्या राउंड ऑफ 16 मध्ये पोहचणारी मनिका पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
Manika Batra Paris Olympics 2024: सोमवारी उशीरा राउंड ऑफ 32 मध्ये मनिकाचा सामना फ्रान्सची भारतीय वंशाची खेळाडू पृथिका पवाड हिच्याशी झाला. मनिकानं उत्तम कमगिरी करत राउंड ऑफ 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. मनिका बत्रा (Manika Batra)ऑलिम्पिकच्या राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू आहे. विशेष म्हणजे, मनिका जागतिक रँकिंगमध्ये 28व्या स्थानावर असून पृथिका तिच्यापेक्षा 10 स्थान पुढे आहे. मानिकाने सामना 11-9, 11-6,11-9, 11-7 असा सरळ गेममध्ये जिंकला. यापूर्वी टेबल टेनिसमध्ये कोणताही भारतीय खेळाडू राउंड ऑफ 32 च्या पुढे जाऊ शकला नव्हता. मनिकानं हा रेकॉर्ड मोडला आहे. (हेही वाचा:Manika Batra Paris Olympics 2024: टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राचा ॲना हर्सीवर दमदार विजय; राऊंट ऑफ 32 मध्ये पोहोचणारी ठरली दुसरी भारतीय महिला )
पहिल्या गेममध्ये मनिका 2 गुणांनी मागे होती. मात्र तिनं शानदार कमबॅक करत गेम 11-9 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मनिकानं सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करत 11-6 ने आरामात विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये पृथिकानं थोडाफार संघर्ष केला, मात्र मनिकानं हा गेम 11-9 ने आपल्या नावे केला. मनिकानं चौथा गेम 11-7 असा आपल्या नावे केला. (हेही वाचा:Badminton At Paris Olympics 2024: लक्ष्य सेनने दुसऱ्या गटातील लढतीत बेल्जियमच्या ज्युलियन कॅरागीचा 21-19, 21-14 ने केला पराभव )
पोस्ट पहा
आता राउंड ऑफ 16 मध्ये मनिकाचा सामना जपानची हिरोनो मियू, हाँगकाँगची झू चेंगझू यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्रा पदकाची दावेदार आहे, मात्र पदक जिंकण्यासाठी तिला नॉकआऊट सामन्यांमध्येही अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल.