Karnataka Premier League Match Fixing Case: आंतरराष्ट्रीय बुकी सय्यामला अटक

कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी सेंट्रल क्राइम ब्रँचने आंतरराष्ट्रीय बुकी सय्यामला अटक केली आहे.

Bookie Sayyam (PC - ANI Twitter)

Karnataka Premier League Match Fixing Case: कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी (Karnataka Premier League match fixing case) सेंट्रल क्राइम ब्रँचने (Central Crime Branch) आंतरराष्ट्रीय बुकी सय्यामला (bookie Sayyam) अटक केली आहे. सय्यामला अटक करण्यासाठी लूक आऊट नोटीस पाठवण्यात आली होती. सय्याम हा हरियाणाचा रहिवाशी आहे. याआधी केपीएल (KPL) प्रकरणात मॅच फिक्सिंग प्रकरणी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरुतील पथकाने अटक केली होती.

याप्रकरणी यापूर्वी निशांत शेख या भारतीय क्रिकेटपटूला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तर केपीएलच्या २०१९ च्या बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांनी अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

ANI ट्विट - 

(हेही वाचा - India Vs Bangladesh 3rd T20: रोहित शर्मा घालणार 'या' नव्या विक्रमाला गवसणी; भारतीय संघातील एकाही खेळाडूला करता आली नाही अशी कामगिरी)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये 2011 आणि 2012 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील खेळण्यात आलेल्या आयपीएल सामन्यात सीएम गौतम होता. परंतु, त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. केपीएल प्रकरणात याआधीही काहींना अटक करण्यात आली आहे. बेंगळुरू ब्लास्टर्सचे टीमचे बॉलिंग प्रशिक्षक वीनू प्रसाद, सेलिब्रिटी ड्रमर भावेश बाफना यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

बाफना यांनी एका खेळाडूला एका षटकात 10 धावा देण्यासाठी आमिष दिलं होतं. तसेच बंगळुरूमध्ये भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. निशांत सिंह शेखावत सट्टेबाजांच्या संपर्कात होता. खेळाडूंनी मॅच फिक्स करावी यासाठी त्याने बंगळुरू ब्लास्टर्स टीमचे बॉलिंग प्रशिक्षक विनू प्रसादशी संपर्क केला होता.