Japan Open 2019: साई प्रणित जपान ओपनच्या सेमीफायनलमध्ये; पी व्ही सिंधू क्वार्टर फाइनलमध्ये गारद, 6 दिवसात यमागुची विरुद्ध दुसरा पराभव

चौथ्या क्रमांकावरील जपानची अकाने यामागूची ने क्वार्टर फाइनलमध्ये 21-18, 21-15 असे पराभूत केले.

P. V Sindhu (Photo Credits: Hotstar)

स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू (PV Sindhu) जपान ओपनच्या (Japan Open) क्वार्टर फाइनलमध्ये पराभूत झाली. चौथ्या क्रमांकावरील जपानची अकाने यामागूची (Akane Yamaguchi) ने क्वार्टर फाइनलमध्ये 21-18, 21-15 असे पराभूत करत सिंधूचे यंदाच्या वर्षीचे पहिले टूर्नामेंट जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळवले आहे. गेल्या आठवड्यात इंडोनेशिया ओपनच्या (Indonesia Open) अंतिम फेरीत सिंधूला यामागूचीच्या विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. हे सिंधूचे मागील 6 दिवसात यामागूची विरुद्ध दुसरा पराभव आहे. मागील रविवारी इंडोनेशिया ओपनच्या फायनलमध्ये यामागूचीने सिंधूचा 21-15, 21-16 असा दोन गेममध्ये पराभव केला होता. महत्वाचे म्हणजे यामागूची विरुद्ध 16 सामन्यातील सिंधूचा हा 6 वा पराभव आहे.

सिंधू आणि यामागूची मधील पहिला गेम चुरशीचा झाला. पण त्यात यामागुची सरस ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधू पुनरागमन करेल असा विश्वास चाहत्यांना होता, पण दुसऱ्या गेममध्ये सिंधू पहिल्या गेमपेक्षा वाईट प्रकारे पराभूत झाली.

दुसरीकडे, पुरुष एकेरीत साई प्रणीत (Sai Praneeth) याने क्वार्टर फाइनलमध्ये इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्टो 21-12, 21-15 याला सरळ गेममध्ये पराभूत केले. सेमीफाइनलमध्ये त्याचा सामना जपानच्या केंटो मोमोटा (Kento Momota) याच्याशी होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif