Neeraj Chopra Post: भाला फेकण्याऐवजी नीरज चोप्राने फेकले मित्राला, पहा व्हायरल व्हिडिओ

नीरज चोप्रा स्वित्झर्लंडच्या सुंदर बर्फाच्छादित मैदानांचा आनंद घेत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नीरजने 14 सप्टेंबर रोजी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो त्याच्या काही मित्रांसोबत हँग आउट करताना दिसत आहे.

Neeraj Chopra

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Javelin thrower Neeraj Chopra) सध्या स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) सुट्टीचा आनंद घेत आहे. नीरज चोप्राने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून कोणीही हसेल. नीरज चोप्रा स्वित्झर्लंडच्या सुंदर बर्फाच्छादित मैदानांचा आनंद घेत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नीरजने 14 सप्टेंबर रोजी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो त्याच्या काही मित्रांसोबत हँग आउट करताना दिसत आहे. नीरजच्या हातात भालाऐवजी कॅमेरा होता. यादरम्यान भालाफेक शैलीत धावत असताना त्याने मित्राला भिंतीच्या दिशेने फेकले.

यानंतर नीरजही बर्फाच्या डोंगरावर स्कीइंग कार्टमध्ये बसून मजा करताना दिसला.  नीरजच्या या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दिली आहे. दुखापतीतून परतल्यानंतर नीरज चोप्राने गेल्या आठवड्यातच स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. डायमंड लीगच्या यशामुळे नीरजने आपला हंगाम संपवण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neeraj Chopra (@neeraj____chopra)

म्हणजेच यंदा तो इतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नाही. भालाफेकमध्ये नीरज चोप्रा ही भारताची नवी ओळख म्हणून उदयास आली आहे. त्याने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. तेव्हापासून नीझर आपल्या भाल्याच्या सहाय्याने सतत नवनवीन विक्रम रचत आहे. त्यामुळेच क्रीडाप्रेमींमध्ये त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now