IND Vs SL 3rd T20I: टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज; मालिकेवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज
गुवाहाटी (Guwahati) येथे खेळलेला पहिला सामना पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला होता.
भारत विरुद्ध श्रीलंका (IND Vs SL) यांच्यात शुक्रवारी तिसरा समाना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मैदानात रंगणार आहे. गुवाहाटी (Guwahati) येथे खेळलेला पहिला सामना पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर इंदूर (Indore) येथे खेळला गेलेल्या दुसर्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यामुळे श्रीलंका अखेरच्या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडण्यासाठी मैदानात उतरेल.
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना इंदूर येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला मोठी धावसंख्या करु दिली नाही. दरम्यान, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांनी मिळून 5 विकेट घेतली. या सामन्यात जसप्रीस बुमराह याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा केली होती. या सामन्यात बुमराहने 4 षटकात 32 धावा देऊन 1 बळी घेतला होता. हे देखील वाचा-India Here We Come! डेविड वॉर्नर याने टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेआधी भारतीय चाहत्यांसाठी दिला खास संदेश
संघ-
भारत: विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), लोकेश राहुल, नवदीप सैनी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), धनंजय डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), ओशादा फर्नांडो, अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणथिलाका, लाहिरू कुमारा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंका, भानुण राजकथा , दासुन शंका.
तसेच, श्रीलंका संघातील गोलंदाज इसरू उडानाला दुखापत झाल्यामुळे तो तिसऱ्या सामन्यातही खेळू शकणार नाही. यामुळे श्रीलंका संघासाठी आणखी अडचण निर्माण झाली आहे.