IND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय संघ मॅन्चेस्टर मध्ये दाखल, BCCI ने दिला Weather रिपोर्ट
इंग्लंडमध्ये जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा मॅन्चेस्टर शहरात पडला आहे.
पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध होणाऱ्या विश्वकप सामन्यासाठी भारतीय संघ मॅन्चेस्टर (Manchester) मध्ये पोहचला आहे. मॅन्चेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे भारत (India)-पाक संघामध्ये खेळाला जाईल. पण, या सघांत रविवारी सामना होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे कारण गेले कित्येक दिवस मॅन्चेस्टर मध्ये पावसाचे सत्र सुरूच आहे. त्यात मँचेस्टर येथील हवामान बरेच खराब आहे. इंग्लंडमध्ये जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा मॅन्चेस्टर शहरात पडला आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टर मध्ये पाऊस पडल्यास तब्बल 100 कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे)
बीसीसीआय (BCCI) ने ही मॅन्चेस्टर मधील हवामानाचा एक रिपोर्ट शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम चा एक फोटो शेअर केलंय. त्या फोटोनुसार ओल्ड ट्रॅफर्डवर ढगाळ वातावरण दिसत आहे आणि संपूर्ण खेळपट्टीवर झाकून ठेवलेली दिसून येते.
दरम्यान, भारत-पाक संघाचा पावसामुळे प्रत्येकी एक-एक सामना रद्द करण्यात आला होता आणि जर आणखी एक सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांतील खेळाडूही प्रचंड निराश होतील.
दुसरीकडे, भारताचा युवा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) इंग्लंड मध्ये पोहचला असून तो सध्या टीम बरोबर मॅन्चेस्टरमध्ये आहे. पंत हा भारतीय संघात शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या जागी गेला असून जोवर संघ व्यवस्थापन धवनच्या दुखापती बाबत अंतिम निर्णय घेत नाही तोवर त्याला संघाचा भाग म्हुणुन वावरत येणार नाही.