ICC World Cup 2019: हे 3 Players करू शकतात दुखापतग्रस्त शिखर धवन ला भारतीय संघात Replace

धवनच्या बाहेर जाण्याने बरेच प्रश्न उभे राहतात, आता रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार आणि मग चौथ्या स्थानावर कोण खेळणार?

Image Credit: Getty

भारतीय संघाच्या 'मिशन वर्ल्ड कप' ला एक मोठा धक्का बसलेला आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध मारक खेळी केलेला डावखुरा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) दुखापतीमुळे बाहे पडला आहे. धवनच्या बाहेर जाण्याने बरेच प्रश्न उभे राहतात, आता रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सलामीला कोण येणार आणि मग चौथ्या स्थानावर कोण खेळणार? (दुखापतग्रस्त शिखर धवन CWC 2019 च्या बाहेर, रिषभ पंतला संघात समाविष्ट करा, Netizens ची मागणी!)

आता जर संघाकडे बघितले तर के. एल राहुल (KL Rahul) रोहितसह सलामीला येऊ शकतो. राहुलही यापूर्वीच आयपीएलमध्ये सलामी बल्लेलाज म्हणून खेळाला आहे शिवाय कसोटी क्रिकेटमध्येही तो सलामीला येतो. अशा परिस्थितीत, राहुल 13 जूनला होणाऱ्या न्यूझीलँड (New Zealand) विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर मैदानात उतरू शकतो. पण, जर राहुल सलामीला येणार, तर मग चौथ्या नंबरला कोण फलंदाजी करणार?

जर राहुल, रोहित सोबत सलामीला येतो तर त्याच्या जागी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik), विजय शंकर (Vijay Shankar) चौथ्या स्थानी खेळू शकतात. कार्तिक आणि विजय भारतीय संघासोबत इंग्लंडमधेच वास्तव्यात आहे. आणि आता धवन संघातून बाहेर पडल्यामुळे ह्या दोघांपैकी एकाचा संघात समावेश होऊ शकतो.

दुसरा पर्याय

विजय आणि कार्तिकला वगळता, भारतीय संघ रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) ही प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतात. अष्टपैलू हर्दिक पंड्याला (Hardik Pandya) तिसऱ्या स्थानावर फलंदाजी देऊन, जडेजाला पाचव्या किंवा सहाव्या स्थानी संघात जागा मिळू शकते. पंड्या ह्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात चौथ्या नंबरवर फलंदाजी करायला आला होता. त्या सामन्यात हार्दिकने 27 चेंडूत 47 धावा केल्या होत्या.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपले पहले दोन्ही सामने जिंकले आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तर दुसऱ्या सामन्यात गरजेते ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ICC गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप झेतली आहे. भारताचा सामना आता अव्वल स्थानी बसलेल्या न्यूझीलंडशी 13 जूनला ट्रेंट ब्रिज स्टेडियम वर खेळला जाईल.