ICC World Cup 2019: दुखापतग्रस्त शिखर धवन CWC 2019 च्या बाहेर, रिषभ पंतला संघात समाविष्ट करा, Netizens ची मागणी!
आता धवन बाहेर पडल्यामुळे रोहित शर्मा सोबत सलामीला कोण येणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियाकार सुरु झाली आहे. Twitter वर रिषभ पंतचा किंवा श्रेयस अय्यर चा Team India मध्ये समावेश करण्याची मागणी केली.
दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) सारख्या बलाढ्य संघाना पराभूत केलेल्या भारतीय (India) संघाला मोठा धक्का बसलेला आहे. भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhawan) 3 आठवड्यांसाठी संघांतून बाहेर करण्यात आले आहे. धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. आता धवन बाहेर पडल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सलामीला कोण येणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियाकार सुरु झाली आहे. (ICC World Cup 2019: Team India ला मोठा धक्का, शिखर धवन दुखपतीने भारतीय संघातुन बाहेर)
चाहत्यांनी धवनच्या दुखापतीबद्दल दुःख व्यक्त केले तर काहींनी Twitter वर रिषभ पंतचा (Rishabh Pant) चा Team India मध्ये समावेश करण्याची मागणी केली. काही जणांनी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि विजय शंकर (Vijay Shankar) यांचाही संघात समावेश करण्याचे म्हटले आहे. कार्तिक आणि शंकर आधीपासूनच भारतीय विश्वचषक संघाचा एक भाग आहेत परंतु त्यांचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केल नाही.
भारताने आपले विश्वकप मधले पहिले दोन्ही सामने जिंकले आहे अँड विजयाची हॅटट्रिक मारण्याच्या इच्छेने भारतीय संघ न्यूझीलंडशी (New Zealand) दोन हात करतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)