ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात; गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडून सर्व संघांना शुभेच्छा

त्याचे अवचित्य राखून गुगल (Google)चे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगलचे कडून खास डुडल शेअर करत सर्व संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo Credit- X

ICC T20 World Cup Google Doodle: पुरुषांच्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेला आज २ जूनपासून सुरूवात झाली आहे. त्याचे अवचित्य राखून गुगल (Google)कडून खास डुडल शेअर करण्यात आले आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांनाही आयसीसी टी 20 क्रिकेट वर्ल्डकपबाबत ( ICC Men's T20 Cricket World Cup) उत्सुकता आहे आणि यावर्षी संघांच्या वाढलेल्या सहभागावर त्यांनी भाष्य केले. X वर एका पोस्टमध्ये Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले की, “यंदा आयसीसी टी 20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पूर्वीपेक्षा जास्त संघ सहभागी झालेत. आपल्या आवडत्या खेळाचा जागतिक स्तरावर विकास होताना पाहणे खूप आनंददायी आहे. आजच्या Doodle मध्ये याचा आनंद साजरा केला जात आहे. सर्व संघांना शुभेच्छा!” असे सुंदर पिचाई यांनी म्हटले.

2007 मध्ये स्पर्धेची सुरुवात

ICC T20 वर्ल्डकपची सुरूवात 2007मध्ये झाली. 2007 मध्ये सुरू झाल्यापासून हीस या स्पर्धेची नववी एडिशन आहे. या वर्षी युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये वर्ल्डकप आयोजीत करण्यात आला आहे. जगभरातील विक्रमी 20 संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. संघांना ग्रुप स्टेजसाठी पाचपैकी चार गटांमध्ये विभागले गेले आहे. यात प्रत्येक संघ गटातील इतर तिन संघासोबत एक-एक मॅच खेळतील.