Video: Coronavirus बद्दल चिनी लोकांवर भडकला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर, खाण्याच्या सवयीवर केली टीका

कोविड-19 च्या उद्रेकातून जगभरात 5,400 लोकं मरण पावले असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने कोरोनव्हायरस संक्रमित करण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांचा कडक शब्दांत निषेध केला आहे आणि त्याचा उद्रेक होण्यासाठी केवळ चीनलाच जबाबदार धरले आहे.

शोएब अख्तर (Photo Credit: ScreenGrab/YouTube)

कोविड-19 (COVID-19)च्या उद्रेकातून जगभरात 5,400 लोकं मरण पावले असताना पाकिस्तानचा (Pakistan) माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) कोरोनव्हायरस (Coronavirus) संक्रमित करण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांचा कडक शब्दांत निषेध केला आहे आणि त्याचा उद्रेक होण्यासाठी केवळ चीनलाच जबाबदार धरले आहे. शोएबने कोरोना विषाणूमुळे आयपीएल सह जगभरातील अन्य क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्याने निराशा  यक्त केली आहे. या घातक विषाणूमुळे आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले, तर पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यांचा कालावधी चार दिवसांनी कमी करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीग 15 एप्रिल पर्यंत स्थगित केले, तर पाकिस्तान बोर्डानेही पीएसएल (PSL) 22 मार्च ऐवजी 18 मार्चला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, पीएसएलमध्ये उर्वरित सामने लाहोरमध्ये  आले आहे. (Coronavirus: विराट कोहली ने COVID-19 च्या धोक्यात चाहत्यांना केले आवाहन, शेअर केला प्रेरणादायक संदेश)

शोएबने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट, युट्युबवर व्हिडिओ शेअर केला आणि चीनवर टीकास्त्र सोडले. शोएबने त्यांच्या खाण्याच्या सवयींवर निशाणा साधला आणि संपूर्ण विश्वाला धोक्यात टाकण्याचा आरोप केला. "आपण बॅट्स कशा खातात, त्यांचे रक्त आणि मूत्र कसे पितात आणि जगभरात काही विषाणू पसरवता...मी चीनी लोकांबद्दल बोलत आहे. त्यांनी जगाला धोक्यात टाकले आहे. मला खरंच समजत नाही की आपण बॅट्स, कुत्री आणि मांजरी कशा खाऊ शकता. मला खरोखर राग येतो आहे, "अख्तरने आपल्या यूट्यूब वाहिनीवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले.

अख्तर म्हणाला, "माझ्या रागाचे सर्वात मोठे कारण पीएसएल आहे, अनेक वर्षांनी क्रिकेट पाकिस्तानमध्ये परतले आहे आणि पहिल्यांदाच संपूर्ण पीएसएल सीझन पाकिस्तानमध्ये खेळला जात आहे आणि हेही आता धोक्यात आले आहे. परदेशी खेळाडू देश सोडत आहेत आणि सामने रिक्त स्टेडियमवर खेळले जातील." चीनच्या वुहान शहरात उगम झालेल्या कोरोनाव्हायरस आतापर्यंत 100 हून अधिक देशांमध्ये पसरले असून त्यात 1,30,000 लोक संक्रमित झाले आहेत. शनिवारी पाकिस्तानमध्ये रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली.