झिंबाब्वे क्रिकेट बोर्ड, व्यवस्थापकीय संचालक सरकारी युनिटद्वारे निलंबित, हे आहे कारण

स्पोर्ट्स अॅण्ड रिक्रिएशन कमिशन (Sports and Recreation Commission) (एसआरसी) ने असे म्हटले आहे की संविधान आणि इतर वाद-विवादांच्या उल्लंघनांच्या अनेक तक्रारी केल्या गेल्या मुले ही कारवाही करण्यात आली आहे.

प्रतिकारात्मक फोटो (फाइल फोटो)

झिम्बाब्वे (Zimbabwe) च्या क्रीडा आणि मनोरंजन आयोगाणे देशाच्या क्रिकेट बोर्डाला 21 जून रोजी ताबडतोब रित्या निलंबित केले आहे. अधिक माहिती प्रमाणे, झिंबाब्वे क्रिकेट (Zimbabwe Cricket) चे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक देवेगोरो माकोनी (Givemore Makoni) यांनाही त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली गेली आहे. क्रिकेट बोर्ड चालवण्यासाठी एक हंगामी कमिटी बनवण्यात आले आहे. या कमिटी मध्ये डेव्हिड एल्मन-ब्राउन (David Ellman-Brown), अहमद इब्राहिम (Ahmed Ibrahim), चार्ली रॉबर्टसन (Charlie Robertson), सायप्रियन मंडेन्ग (Cyprian Mandenge), रॉबर्टसन चिनेंजेगेरेरे (Robertson Chinyengetere), सेकेसाई नोखोकवा (Sekesai Nhokwara) आणि डंकन फ्रॉस्ट (Duncan Frost) यांचा समावेश यांचा समावेश आहे.

स्पोर्ट्स अॅण्ड रिक्रिएशन कमिशन (Sports and Recreation Commission) (एसआरसी) ने असे म्हटले आहे की संविधान आणि इतर वाद-विवादांच्या उल्लंघनांच्या अनेक तक्रारी केल्या गेल्या मुले ही कारवाही करण्यात आली आहे.

झिंबाब्वे क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) (ICC) चा पूर्ण सदस्य असल्याने क्रिकेटच्या नियमांच्या अधीन आहे, परंतु एसआरसीने स्पष्ट केले की आयसीसी हक्कांचा अर्थ असा नाही की झिम्बाब्वे क्रिकेट देशाच्या कायद्यांच्या अधीन नाही. पुढील महिन्यात आयसीसीची वार्षिक परिषदेसाठी पार पडेल आणि या बैठकीत हा विषय घेण्याची अपेक्षा आहे.