Khelo India Youth Games 2020 Schedule: जाणून घ्या गुवाहाटीमधील खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

गेम्सची तिसरी आवृत्ती 10 जानेवारी 2020 रोजी सुरू होऊन 22 जानेवारी रोजी संपुष्टात येईल. या स्पर्धेत अंडर-17 आणि 21 वर्षांखालील वयोगटातील 37 संघांच्या सहभागाने 20 सामने खेळले जातील.

खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 (Photo Credit: IANS)

खेलो इंडिया युथ गेम्स (Khelo India Youth Games) 2020 ची सुरुवात झाली आहे. गेम्सची तिसरी आवृत्ती 10 जानेवारी 2020 रोजी सुरू होऊन 22 जानेवारी रोजी संपुष्टात येईल. या स्पर्धेत अंडर-17 आणि 21 वर्षांखालील वयोगटातील 37 संघांच्या सहभागाने 20 सामने खेळले जातील. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इंदिरा गांधी स्टेडियमवर करण्यात आला होता. यावर्षी 451 पदकांच्या स्पर्धेत सायकलिंग आणि लॉन बाऊलमधील दोन नवीन खेळ जोडले गेले आहेत. या स्पर्धेची सुरुवात 10 जानेवारीपासून तिरंदाजीने (Archery) होईल. तिरंदाजीनंतर 11 जानेवारीपासून अ‍ॅथलेटिक्स, 18 जानेवारीपासून बॅडमिंटन, 16 जानेवारीपासून बास्केटबॉल आणि बॉक्सिंग, 12 आणि 13 जानेवारीला जिम्नॅस्टिक, 9 जानेवारीपासून हॉकी, 13 जानेवारीपासून ज्युडो, 10 जानेवारीपासून कबड्डी, 9 जानेवारीपासून खो-खो, 15 जानेवारी पासून लॉन बॉल, 12 जानेवारी पासून शूटिंग, 11 जानेवारी पासून जलतरण, 17 जानेवारी पासून टेनिस टेनिस, टेनिस 10 जानेवारी पासून, व्हॉलीबॉल 17 जानेवारी, 9 जानेवारीपासून वेट लिफ्टिंग आणि वेसलिंग 16 जानेवारी पासूनसुरु होईल.

यापूर्वी, 2018 मध्ये पहिल्यांदा राजधानी दिल्लीमध्ये खेलो इंडिया स्कूल गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीनंतर त्याची दुसरी आवृत्ती 2019 मध्ये पुण्यात झाली पण त्याचे नाव 'खेलो इंडिया यूथ गेम्स' असे ठेवण्यात आले. खेलो इंडिया यूथ गेम्स समजण्यासाठी आधी हे समजले पाहिजे की हा खेळो इंडिया अभियानाचा एक भाग आहे. खेळो इंडिया हा देशातील खेळाच्या विकासासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. हे क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रशासित केले जाते. 2018 मध्ये पहिल्यांदा याची कल्पना देशासमोर आली.

तत्कालीन क्रीडामंत्री आणि ऑलिम्पिक पदकविजेता राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले होते की, खेलो इंडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे कारण त्यांना त्यातून भारताला फिट बघायचे आहे. यासह खेलो इंडियाचे उद्दीष्ट म्हणजे देशाच्या दुर्गम भागातील प्रतिभा शोधणे आणि त्यांना घडविणे, जेणेकरून ते पुढे जाऊन उच्च स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करु शकतील.