FIH Hockey World Cup Schedule: एफआयएच हॉकी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारताचा सामना कधी आणि कोणासोबत असेल ?
पहिल्या सामन्यात स्पेनचा संघ त्याच्यासमोर असेल आणि मैदान हे राउरकेला येथील नवेला बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियम असेल. भारत आणि स्पेनच्या संघांच्या क्रमवारीत मोठी तफावत आहे.
भारत पुढील वर्षी हॉकी विश्वचषकाचे (Hockey World Cup) यजमानपद भूषवणार असून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (International Hockey Federation) मंगळवारी या विश्वचषकाचे वेळापत्रक (FIH Hockey World Cup Schedule) जाहीर केले. FIH ने ट्विट करून याबाबत माहिती दिली.
यजमान भारत या विश्वचषकातील पहिला सामना 13 जानेवारीला खेळणार आहे. पहिल्या सामन्यात स्पेनचा संघ त्याच्यासमोर असेल आणि मैदान हे राउरकेला येथील नवेला बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियम असेल. भारत आणि स्पेनच्या संघांच्या क्रमवारीत मोठी तफावत आहे. भारतीय संघ एफआयएच क्रमवारीत पाचव्या तर स्पेन आठव्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही संघ पूल-डीमध्ये असून वेल्स संघही याच गटात आहे. त्याचे रँकिंगही भारतापेक्षा कमी आहे.
वेल्स सध्या जागतिक क्रमवारीत 16व्या स्थानावर आहे. याशिवाय इंग्लंडचा संघही या गटात आहे. विश्वचषकाच्या पहिल्या दिवशी भारत आणि स्पेन यांच्यात सामने होणार आहेत. स्पेनला हरवल्यानंतर टीम इंडियाला 15 जानेवारीला पुन्हा एकदा इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हा सामना देखील राउरकेला येथे होणार आहे. यानंतर भुवनेश्वरमध्ये 19 जानेवारीला त्याचा सामना वेल्सशी होईल. मंगळवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या दिवशी चार सामने खेळवले जाणार आहेत.
भारत आणि स्पेन व्यतिरिक्त रिओ 2016 ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल तर जगातील नंबर वन ऑस्ट्रेलियाचा सामना फ्रान्सशी होईल. हे दोन्ही सामने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर होणार आहेत. यानंतर राउरकेला येथे दोन सामने खेळवले जातील, ज्यामध्ये पहिला सामना इंग्लंड आणि वेल्समध्ये होईल, तर दुसऱ्या सामन्यात भारत आणि स्पेन संध्याकाळी 7 वाजल्यापासून आमनेसामने येतील. हेही वाचा ICC Women's ODI Rankings: हरमनप्रीत कौरची आयसीसी क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप
ओडिशामध्येच खेळल्या गेलेल्या 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन ठरलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ बेल्जियम 14 जानेवारीला भुवनेश्वरमध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याच दिवशी राउरकेला येथे माजी चॅम्पियन नेदरलँडचा सामना मलेशियाशी होणार आहे. मागच्या वेळी कांस्यपदक विजेते ऑस्ट्रेलिया पूल अ मध्ये आहे जिथे त्यांचा सामना अर्जेंटिना, फ्रान्स आणि आफ्रिकन चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेशी होईल.
गतविजेता बेल्जियम अव्वल सीडेड आहे आणि 2006 च्या विजेते जर्मनी, कोरिया आणि जपानसह पूल बी मध्ये आहे. जागतिक क्रमवारीत बेल्जियम दुसऱ्या तर जर्मनी चौथ्या स्थानावर आहे.पूल सी मध्ये गतवेळचे फायनलिस्ट नेदरलँड, न्यूझीलंड, मलेशिया आणि विश्वचषक पदार्पण करणाऱ्या चिलीचा समावेश आहे. नेदरलँड्स जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे तर मलेशिया नववा विश्वचषक खेळत आहे .