IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतरही टीम इंडियाला 'या' कारणासाठी बसला दंड

भारतीय संघाने (Team India) पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) 3 धावांनी पराभव केला, परंतु भारतीय संघाला 20 टक्के मॅच फीचा दंड (Penalty) ठोठावण्यात आला.

Team India (PC - ANI)

भारतीय संघाने (Team India) पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) 3 धावांनी पराभव केला, परंतु भारतीय संघाला 20 टक्के मॅच फीचा दंड (Penalty) ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर रेटमुळे (Slow over rate) भारतीय संघाला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला. त्याचवेळी भारतीय कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) स्लो ओव्हर रेटबाबत चूक मान्य केली आहे.  सामनाधिकारी रिची रिचर्डसन (Richie Richardson) यांनी भारतीय कर्णधारावर हा दंड ठोठावला आहे. वास्तविक, निर्धारित वेळेपर्यंत भारतीय संघाने 1 षटक कमी टाकले होते. अशाप्रकारे खेळाडूंव्यतिरिक्त सपोर्ट स्टाफवर मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारण्यात आला.

विशेष म्हणजे, पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला होता. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 15 धावांची गरज होती, मात्र मोहम्मद सिराजने त्या षटकात केवळ 11 धावा दिल्या.  त्यावेळी वेस्ट इंडिजचे फलंदाज रोमियो शेफर्ड आणि ओकील होसेन क्रीजवर होते.

त्याचवेळी, याआधी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकात 7 विकेट गमावत 308 धावा केल्या. याआधी यजमान वेस्ट इंडिजला बांगलादेशविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजला एकही सामना जिंकता आला नाही. त्याचवेळी, 2018 सालापासून वेस्ट इंडिज संघाने भारताविरुद्ध सलग 6 एकदिवसीय सामने गमावले आहेत.