IPL Auction 2025 Live

खेळाडूंना षटकार मारण्यावर बंदी, सिक्स मारल्यास फलंदाज होणार बाद, इंग्लंडच्या क्रिकेट क्लबचा अजब निर्णय

जुन्या काळात क्रिकेट शांत वातावरणात खेळलं जायचं.

Cricket Representative image (Photo credit: Twitter)

इंग्लंडमधील साऊथविक अँड शोरहॅम क्रिकेट क्लबनं एक अजब निर्णय घेतला आहे. या क्लबच्या मैदानावर खेळाडूंना षटकार मारण्यावर बंदी घातली आहे.  मैदानाजवळील नागरिकांनी त्यांच्या संपत्तीचं नुकसान होत असल्याची तक्रार केली होती. याशिवाय मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना दुखापत होण्याची आणि वाहनांच्या नुकसानाची संख्या वाढत असल्याने या क्लबने आता षटकार मारण्यावर बंदी टाकली आहे.  जेव्हा कोणताही खेळाडू पहिला षटकार मारेल त्यावेळी त्याला वॉर्निंग दिली जाईल. ज्या संघाच्या खेळाडूनं षटकार मारला आहे त्यांना धावा मिळणार नाहीत. यानंतर जे खेळाडू षटकार मारतील त्यांना बाद दिलं जाईल.  ( Hardik Pandya याची विकेट, Suryakumar Yadav टी-20 संघाचा कर्णधार; तंदुरुस्ती ठरला कळीचा मुद्दा, अजित आगरकर यांच्याकडूनही स्पष्टीकरण)

साउथविक अँड शोरहॅम क्रिकेट क्लबचे खजिनदार मार्क ब्रोक्सअप यांनी या निर्णयाची माहिती दिली. जुन्या काळात क्रिकेट शांत वातावरणात खेळलं जायचं.  टी 20 आणि मर्यादित षटकांचं क्रिकेट सुरु झाल्यापासून या खेळात आक्रमकता आलेली आहे.  एका 80 वर्षीय व्यक्तीनं म्हटलं की आजकाल खेळाडूंमध्ये इतका उत्साह भरलाय की त्यांना षटकार मारण्यासाठी मैदान कमी पडत आहे.

साऊथविक अँड शोरहॅम क्रिकेट क्लबनं हा नवा प्रयोग सुरु केला आहे. या नियमाचा फायदा क्लबला होऊ शकतो. यामुळं क्लबला आर्थिक भूर्दंड कमी प्रमाणात बसेल. मात्र, क्रिकेटमध्ये षटकार मारण्यावर बंदी घातल्यास खेळातील आनंद निघून जाण्याची शक्यता अनेक क्रिकेट प्रेमीने व्यक्त केली आहे.