Hardik Pandya याची विकेट, Suryakumar Yadav टी-20 संघाचा कर्णधार; तंदुरुस्ती ठरला कळीचा मुद्दा, अजित आगरकर यांच्याकडूनही स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे T-20 संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2026 च्या पार्श्वभूमीवर निवड समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Hardik Pandya याची विकेट, Suryakumar Yadav टी-20 संघाचा कर्णधार; तंदुरुस्ती ठरला कळीचा मुद्दा, अजित आगरकर यांच्याकडूनही स्पष्टीकरण
Hardik Pandya, Ajit Agarkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे T-20 संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2026 च्या पार्श्वभूमीवर निवड समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची निवड होईल, असा अंदाज क्रिकेटवर्तुळातून व्यक्त होत होता. मात्र, अचानकपणे सूर्यकुमारचे नाव पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरम्यान, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, हार्दिक पांड्या संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, असे असले तरी कर्णधार पदाची निवड करताना त्याची तंदुरुस्ती हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो.

फिटनेसची चिंता आणि नेतृत्व गुण

अजित आगरकर यांनी म्हटले की, हार्दिक पांड्या अजूनही आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, पण त्याचा फिटनेस एक आव्हान आहे. आम्हाला एका कर्णधाराची गरज आहे जो जास्त वेळा उपलब्ध असेल. कर्णधार होण्यासाठी सूर्यकूमार यादवमध्ये आवश्यक गुण आहेत आणि आम्ही हार्दिकला अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. (हेही वाचा, IND vs SL T20I Series 2024: टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या 'या' महान खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा; घ्या जाणून)

नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकादरम्यान हार्दिकचा उपकर्णधार म्हणून अनुभव आणि कामगिरी दर्जेदार राहिली. आयपीएलमध्येही त्याने गुजरात टायटन्सचे यशस्वी नेतृत्व केले. असे असले तरी, त्याच्या फिटनेसच्या मुद्द्यांमुळे निवडकर्त्यांच्या निर्णयावर परिणाम झाला. हार्दिकने गुजरात टायटन्सला त्यांच्या पदार्पणाच्या मोसमात दोन फायनल आणि एक ट्रॉफी मिळवून दिली, पण त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. (हेही वाचा, BCCI On Hardik Pandya: हार्दिक पांड्यासाठी बीसीसीआयचा नवा 'आदेश', आता त्याला द्यावी लागणार विशेष परीक्षा)

नाराजी आणि संवाद

आगरकर यांनी यावर भर दिला की, निवडकर्ते म्हणून आम्ही भूमिकेतील बदलांबाबत प्रत्येक खेळाडूशी संवाद साधतो. श्रीलंका दौऱ्यासाठी पांढऱ्या चेंडूच्या (white-ball) अधिकृत संघाची घोषणा होण्यापूर्वी हार्दिकला या निर्णयाची माहिती देण्यात आली होती. आम्ही प्रत्येक खेळाडूशी बोलतो, त्यांची भूमिका बदलली आहे का हे जाणतो. आम्ही हार्दिकशी निर्णय घेण्यापूर्वी बोललो होतो.

एक्स पोस्ट

सूर्यकुमार यादव याची कामगिरी आणि नवी जाबदारी

सर्वोच्च क्रमवारीत असलेला T20I फलंदाज सूर्यकुमार यादव हा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून पदभार स्वीकारेल. यंदाचा टी-20 विश्वचषक रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली जिंकला गेला. बार्बाडोस येथे भारताच्या T20 विश्वचषक विजयानंतर या फॉर्मेटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. यादवची कर्णधार म्हणून पहिली नियुक्ती 27, 28 आणि 30 जुलै रोजी श्रीलंकेविरुद्धची T20I मालिका असेल, सर्व सामने पल्लेकेले येथे होणार आहेत. टी-20 संघाने विश्वचषक सामन्यात केलेली कामगिरी कायम ठेवण्याचे आव्हान नव्या कर्णधारावर असणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2024 11:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).