Wimbledon 2021: नोवाक जोकोविचची ऐतिहासिक कामगिरी, दहाव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश
या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचने हंगेरीच्या मार्टेन फिचोविचवर एकतर्फी विजय मिळवला आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा टेनिसपटू नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) विम्बल्डन स्पर्धेत (Wimbledon 2021) आपली दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचने हंगेरीच्या मार्टेन फिचोविचवर एकतर्फी विजय मिळवला आहे. जोकोविचने या विजयासह विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत दहाव्यांदा प्रवेश केला आहे. जोकोविच यंदाची स्पर्धा जिंकत रॉजर फेडरर (Roger Federer) आणि राफेल नदाल (Rafael Nadal) यांच्या 20 ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हशी होणार आहे.
विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकिविचने मार्टेन फिचोविचला 6-3, 6-4 और 6-4 असे पराभूत केले. तर, जोकोविचने ग्रास कोर्टावर आपला 100 वा विजय मिळवला आहे. 20 ग्रँड स्लॅम रेकॉर्ड जिंकण्यापासून तो केवळ दोन पाऊल दूर आहे. याशिवाय, जोकविचने सलग 19 वा सामना जिंकला आहे. जोकोविचने आपल्या कारकीर्दीत चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी, त्याने तीन वेळा सलग 20 पेक्षा जास्त सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. हे देखील वाचा- Pakistan Cricket Team: ‘पाकिस्तानसाठी खेळणं खूपच सोपं झालंय’, संघात नवीन खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवर Shahid Afridi यांनी PCB वर सोडलं टीकास्त्र
ट्वीट-
नोवाक जोकोविचने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश मिळताच एक मोठा विक्रम केला. जोकोविच जगातील पहिला खेळाडू आहे ज्याने चारही ग्रँडस्लॅममध्ये किमान 75 सामने जिंकले आहेत. याचबरोबर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 82, फ्रेन्च ओपनमध्ये 81, विम्बलडनमध्ये 75 आणि यूएस ओपनमध्ये 75 सामने जिंकले आहेत.