Most Dangerous Celebrity to Search Online in India: सावधान! क्रिस्टियानो रोनाल्डो, एमएस धोनी सर्वात खतरनाक सेलिब्रिटी; इंटरनेटवर नाव सर्च करणं पडेल महागात

McAfeeच्या सर्वेनुसार भारतात ऑनलाईन सर्च होणाऱ्या सेलिब्रिटी म्हणून रोनाल्डोने धोनीला पछाडून पहिले स्थान मिळावे आहे. या संशोधनात असे दिसून आले की रोनाल्डोच्या नावाचा शोध घेणे ऑनलाईनवर सर्वात घातक आहे, आणि त्यांच्या नावाचं सर्च करताना धोकादायक लिंक ओपन होतात.

एमएस धोनी, क्रिस्टियानो रोनाल्डो (Photo Credit: PTI/Getty)

Most Dangerous Celebs to Search Online in India: ही अशी यादी आहे ज्यामध्ये कोणालाही सहभागी व्हायचं नसेल, परंतु जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronalo) आणि सर्वात प्रसिद्ध क्रिकेटर एमएस धोनीची (MS Dhoni) नावे त्यात जोडली गेली आहेत. सध्या आयपीएल सुरु असल्याने विराट कोहली, धोनी, संजू सॅमसन, केएल राहुल अशी नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. पण आपण यापैकी कोणत्याही खेळाडूबद्दल ऑनलाईन सर्च करत असाल तर सावधान व्हा. यामागील कारण म्हणजे McAfeeने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात रोनाल्डो, धोनी यांचे नाव ऑनलाईन सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते. McAfeeच्या सर्वेनुसार भारतात ऑनलाईन सर्च होणाऱ्या सेलिब्रिटी (Most Dangerous Celebs to Search) म्हणून रोनाल्डोने धोनीला पछाडून पहिले स्थान मिळावे आहे. या संशोधनात असे दिसून आले की रोनाल्डोच्या नावाचा शोध घेणे ऑनलाईनवर सर्वात घातक आहे, आणि त्यांच्या नावाचं सर्च करताना धोकादायक लिंक ओपन होतात. दरम्यान, गेल्या वर्षी रोनाल्डो दहाव्या स्थानावर होता तर धोनीने पहिले स्थान मिळवले होते. या धोकादायक सर्च लिस्टमध्ये दुसर्‍या क्रमांकावर ज्या बॉलीवूड स्टार्सचे वर्चस्व आहे ती आहे तब्बू. तापसी पन्नू तिसऱ्या स्थानावर आहे. सुदैवाने यावर्षी धोनी टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. (World's Most Admired 2020 यादीत विराट कोहली टॉप-20मध्ये सामील; क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांचाही समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट)

याशिवाय, जागतिक स्तरावर McAfeeच्या मते अभिनेत्री Anna Kendrick ऑनलाईन सर्च होणारी सर्वात धोकादायक सेलिब्रिटी आहे. रोनाल्डो हा देशातील सर्वात प्रशंसनीय खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याची लोकप्रियता सोशल मीडियावर इतकी प्रचंड आहे. रोनाल्डोची लोकप्रियता केवळ त्याच्या फुटबॉल कौशल्यांसाठीच नव्हे तर त्यांची जीवनशैली, ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट्स, कमाई आणि सोशल मीडिया क्लॅटने देखील वाढली आहे.

McAfeeने त्यांच्या सर्चमध्ये नमूद केले की कोविड दरम्यान भारतीय विशेषत: ऑनलाइन सक्रिय आहेत, बर्‍याच उपकरणांमध्ये त्यांचा उपयोग वाढत आहेत आणि विविध प्रकारच्या करमणुकीसाठी इंटरनेटवर काम करत आहेत. हॅकर्सनी देखील त्यांच्या घोटाळ्याची रणनीती राबविण्यासाठी ग्राहकांच्या वागण्यानुसार या ट्रेंडचा वापर करत आहे.