Zimbabwe Beat Gambia, 12th Match Scorecard: टी-20 मध्ये धावांचा विश्वविक्रम; झिम्बाब्वेचा गाम्बियावर 290 धावांनी ऐतिहासिक विजय

पण आता झिम्बाब्वेने त्यापेक्षा 30 धावा करून इतिहास रचला आहे.

Gambia National Cricket Team vs Zimbabwe National Cricket Team, ICC Mens T20 World Cup Sub Regional Africa Qualifier Group B 2024:  झिम्बाब्वेने गॅम्बियाचा 290 धावांच्या फरकाने पराभव केला आहे. यासह आहे. या सामन्याचा सर्वात मोठा हिरो ठरला तो सिकंदर रझा, ज्याने अवघ्या 43 चेंडूत 133 धावांची नाबाद खेळी करून क्रिकेट विश्वात खळबळ माजवली. त्याने 133 धावा करताना 15 षटकार आणि 7 चौकारही लगावले.

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी पहिल्या 6 षटकांत संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली होती आणि पहिल्या 10 षटकांत संघाने 150 धावा केल्या होत्या. धावांचा वेग वाढत होता आणि 13 षटकांच्या अखेरीस संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडला होता. दरम्यान, सिकंदर रझा हा T20 क्रिकेटच्या इतिहासात झिम्बाब्वेसाठी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने अवघ्या 33 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.  (हेही वाचा  -  Pakistan A Beat United Arab Emirates, 11th Match Scorecard: पाकिस्तान अ संघाने यूएईचा 114 धावांनी केला पराभव, शाहनवाज दहनी यांनी 5 विकेट घेत यूएईच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले )

T20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या

झिम्बाब्वेसाठी या सामन्यात ब्रायन बेनेट (50 धावा), टी मारुमणी (62 धावा) आणि क्लाइव्ह मदंडे यांनी 53 धावांची अर्धशतके झळकावून संघाला 344 धावांच्या ऐतिहासिक धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ नेपाळ होता, ज्याने 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या. पण आता झिम्बाब्वेने त्यापेक्षा 30 धावा करून इतिहास रचला आहे.

सर्वात मोठ्या विजयाचा जागतिक विक्रम

प्रत्युत्तरात 345 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गॅम्बियाच्या संघाची सुरुवात इतकी खराब झाली होती की, धावसंख्या 37 धावा होईपर्यंत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि संपूर्ण संघ 54 धावांवर बाद झाला. गांबिया आता टी-20 सामन्यात सर्वाधिक धावांच्या फरकाने हरणारा संघ बनला आहे. 290 धावांनी पराभूत झाला, याआधी सर्वाधिक धावांच्या पराभवाचा लज्जास्पद विक्रम मंगोलियाच्या नावावर होता, जो नेपाळकडून 273 धावांनी पराभूत झाला होता.