ZIM vs AFG 1st Test 2024 Day Live Update: अफगाणिस्तान विरूद्ध बेन करणचे शानदार अर्धशतक, पहिल्या सत्रात धावसंख्या 2 बाद 92
या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 1-1 असा सामना जिंकला आहे.
Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team Live Telecast: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) पहिला सामना 26 डिसेंबर (गुरुवार) पासून बुलावायो (Bulawayo) येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब (Queens Sports Club) येथे खेळवला जाईल. बॉक्सिंग डे कसोटीत झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, त्यामुळे अफगाणिस्तान प्रथम गोलंदाजी करेल. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 1-1 असा सामना जिंकला आहे. हा समान विक्रम दोन्ही संघांमधील स्पर्धा आणि संतुलित कामगिरी दर्शवतो. आगामी कसोटी मालिकेत कोणता संघ आघाडी घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (हेही वाचा -IND vs AUS 4th Test 2024 Day 1 Stumps: बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने केल्या 311 धावा, भारताला मिळाल्या 6 विकेट; येथे पाहा स्कोरकार्ड)
पाहा पोस्ट -
दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या झिब्बाबे संघाची सुरुवात ही काही खास झाली नाही. झिब्बाबेचा सलामीविर जॉयलॉर्ड गुम्बी हा लवकर बाद झाला. त्याने 30 चेंडूत 9 धावा केल्या. नावेद जर्दनने त्याला बाद केले. यानंतर मात्र बेन कुरन आणि टाकुझ्वानाशे कायतानो यांनी संघाचा डाव संभाळला. बेन कुरनने 74 चेंडूत 68 धावा केरून बाद झाला. त्याला गजनफरने बाद केले. सध्या टाकुझ्वानाशे कायतानो 49 चेंडूत 13 धावाकरून खेळत असून लंच ब्रेक पर्यंत झिब्बाबेची धावसंख्या ही 2 बाद 92 अशी आहे.